शासकीय अभियांत्रिकीत माइंडस्पार्कचा तंत्राविष्कार!

येत्या 28, 29 व 30 सप्टेंबरदरम्यान तांत्रिक महोत्सव : दै. प्रभात आहे मिडीया पार्टनर

पुणे – आशिया खंडातील तिसरी सर्वात जुनी स्वायत्त अभियांत्रिकी संस्था असलेल्या पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात माइंडस्पार्क (Mindspark) या देशातील सर्वात मोठ्या तांत्रिक महोत्सवांचे आयोजन करण्यात आले असून 28, 29 आणि 30 सप्टेंबर रोजी होत असलेल्या या कार्यक्रमाचे संयोजन पूर्णपणे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांद्वारे केले जाते. या महोत्सवासाठी दै. प्रभात मिडीया पार्टनर आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन 2007 मध्ये शुभारंभ झालेल्या या माइंडस्पार्कमध्ये मागील वर्षी 20,000 हून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, तर यावर्षी ही संख्या त्यापेक्षा जास्त असणार आहे.सीडीके ग्लोबल (CDK Global) या शीर्षक प्रायोजकांद्वारे माइंडस्पार्क’18 आपली 12 वी आवृत्ती सादर करीत आहे.

यावर्षी युनेस्को, डिजिटल इंडिया आणि स्किल इंडिया यांच्या सहयोगाने आम्ही आमच्या 39; माईंडस्पार्क “इम्बायबिंब टेक्‍नसी’ (MindSpark-18-imbibing technacy) या संकल्पनेच्या माध्यमातून तांत्रिक मर्यादांच्या विविध पैलूंचे निराकरण करण्यासाठी एकात्मिक दृष्टिकोनास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. अहुजा यांनी सांगितले आहे. दिनांक 28, 29 आणि 30 सप्टेंबरला हा उत्सव आयोजित केला असून अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमध्ये पसरलेल्या तांत्रिक व अतांत्रिक अशा 55+ स्पर्धात्मक कार्यक्रमांचा समावेश असेल,’ असेही डॉ. बी. बी. अहुजा यांनी सांगितले.

माइंडस्पार्क-18 मध्ये मुख्य व्याख्यान मालिका, तांत्रिक प्रदर्शन आणि शिक्षण मेळा यांचा समावेश असेल. तसेच रोबो-वॉर्स, बॉट रेसलिंग, द अमेझिंग रेस, रोबोरेसेस, रेडबुल डोटा कॉन्टेस्ट, गेमिंग झोन, पेंटबॉल झोन आणि असे अनेक कार्यक्रम यामध्ये समाविष्ट आहेत.

28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या शिक्षण मेळ्यामध्ये विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणाबद्दल थोडक्‍यात कल्पना देईल. अॅडव्हाइस इंटरनॅशनलच्या सहकार्याने ओव्हरसीज एज्युकेशन फेअरमध्ये युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलिया या देशांतील विद्यापीठे सहभागी आहेत.

अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट www.mind-spark.org,भेट द्या, असे विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका व माइंडस्पार्कच्या शाखा सल्लागार डॉ. सौ. मीरा मुरली यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)