शासकीय अन्‌ राजकीय अनास्थेमुळे रखडले क्रीडा संकुल

हिंजवडी: राष्ट्रीय क्रीडादिनीही मुळशीतील क्रीडा संकुलाला अवहेलना सोसावी लागत आहे. 2005-2006 मध्ये बांधकाम केलेले भरे येथील क्रीडा संकुल अद्यापपर्यंत राजकीय तसेच शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे धुळखात पडून आहे. हे क्रीड संकुल का चालू होत नाही? याचा शोध घेतला असता प्रशासनाचा ढिम्म कारभार असल्याचे समजत आहे.

22 जानेवारी रोजी क्रीडा संकुलासाठी 80 लाखांच्या कामांचे भूमिपूजन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झाले होते. निधी बॅंकेत पडून असताना तब्बल 7 महिन्यानंतरही काम पूर्णत्वास न गेल्याने या संकुलाची परिसरात दयनीय अवस्था झालेली दिसत आहे. काचा फुटलेल्या, जीर्ण झालेल्या, रंग उडालेल्या भिंती, भिंतींवर उगवलेले गवत, सभोवताली गवताचं साम्राज्य आणि सोबतील भटक्‍या कुत्र्यांचा वावर, असे चित्र पाहून क्रीडाविषयी अनास्था दिसून आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या संदर्भात अधिकाऱ्यांनी दिलेल्या संबंधित ठेकेदाराच्या फोन क्रमांकावर संपर्क केला असता पवार नामक व्यक्तिने सांगितले की, क्रीडा संकुलासाठी संरक्षक भिंत, मैदानाची समपातळी करणे, संकूलाला टाईल्स फरशी बसवणे, पत्रे बदलणे, भेगा पडलेल्या भिंती बुजवणे ही कामे झाली आहेत. केवळ संकूलाला बाहेरचे रंगकाम बाकी आहे. बिल सादर करून 3 महिने झाले आहेत तरी ते न मिळाल्याने रंगकाम बाकी ठेवले आहे. तसेच काचा बसवणे हे निविदेत नसतानाही ते पूर्ण करून देणार आहे. बिलाच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्याने नक्की कोणाचे खरे मानावे? हे काही कळेना. तसेच आमदार महोदय हे अध्यक्ष या नात्याने त्यांनी मध्यस्थी करून क्रीडासंकूल प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे, अशी क्रीडाप्रेमींची इच्छा आहे.

याबाबत तालुका क्रीडा अधिकारी साखरे यांनी सांगितले की, ठेकेदाराने 2 ते 3 दिवसापूर्वीच बिल सादर केले असल्याने ते काढण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.

क्रीडा संकूलाचे काम थोडेच शिल्लक असून केवळ बाहेरचे रंगकाम राहिले आहे. ठेकेदाराला बिल न मिळाल्याने हे काम थांबले असावे. तसेच काम पूर्ण करताना स्थानिक लोकांनी रस्त्यासाठी काम थांबवल्याने अनेक अडथळे आले होते. त्यामुळे कामास विलंब झाला होता.
– विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)