शाळेमुळेच जीवनात प्रगती साध्य

नूमविच्या माजी विद्यार्थ्यांच्या भावना ः गुणवंतांचा गौरव

पुणे – नूमवि शाळेने उत्तम शिक्षण व संस्कार दिल्यामुळेच विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे प्रगती करता आली. शाळेमुळेच जीवनाचे मार्ग मिळाले, अशा भावना पुरस्कार प्राप्त माजी गुणवंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत. नू.म.वि. प्रशालेच्या “आम्ही नूमवीय’ या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात माजी गुणवंत विद्यार्थ्यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी माजी शिक्षक डॉ.न.म.जोशी, शिक्षण प्रसारक मंडळीचे उपाध्यक्ष व शाळा समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण चितळे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका संजीवणी उमासे, आम्ही नूमवी संघटनचे अध्यक्ष अजित रावेतकर, उपाध्यक्ष नीलेश कुलकर्णी, सचिव मिलिंद शालगर, किशोर लोहोकरे आदी उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ प्रा.श्री.द.महाजन व डॉ.विलास अंबिके यांना नू.म.वि.जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. पद्मविभूषण डॉ.अशोक कुकडे, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.राम ताकवले, निवृत्त विंग कमांडर विनायक डावरे, ज्येष्ठ उद्योगपती नारायणदास राठी यांना नू.म.वि.रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. निवेदक सुधीर गाडगीळ, सिनेनाट्य अभिनेते राघवेंद्र कडकोळ, डॉ. संजीव शारंगपाणी, श्रीहरी डावरे, विवेक पराजंपे यांना नू.म.वि. भूषण पुरस्कार देण्यात आला आहे. तर, षशाळा हीच माजी प्रेरणा आहे. शाळेमुळेच बुध्दीमत्तेचा विकास झाला. ज्ञानी व संस्कारी बनता आले. शाळेमुळेच चांगले मित्र मिळाले,श असे पुरस्कार्थीनी स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.