शाळेत नाव बदलून जायची श्रुती हासन

दक्षिणात्य हिरो कमल हासन यांची कन्या श्रुती हासन आतापर्यंत फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुपरिचित नाव बनले आहे. पित्याप्रमाणे ती देखील खूप टॅलेंटेड आहे. तिने अनेक भाषांमध्ये काम केले आहे. आतापर्यंत दक्षिणेतल्या फिल्म इंडस्ट्रीत ती एक नावाजलेली आघाडीची हिरोईनदेखील बनली आहे. बॉलिवूडमध्येही तिचे काही सिनेमे झाले आहेत. पण तिला हिंदीमध्ये म्हणावे तसे यश अद्याप मिळालेले नाही. नुकतेच तिचा 33 वा वाढदिवस झाला यानिमित्ताने तिने आपल्या बालपणच्या काही आठवणी शेअर केल्या.

लहानपणी शाळेत जाताना तिला नाव बदलून जावे लागत असायचे. आपण सुपरस्टारची लेक आहोत, हे लोकांना माहिती होऊ नये, असेच तिला वाटत असायचे. त्यासाठी तिने शाळेत आपले नाव पूजा रामचंद्रन ठेवले होते. तिच्या एका बॉयफ्रेंडचे फोटो ती नेहमी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अॅक्‍टिंग व्यतिरिक्‍त ती गायिका, मॉडेल आणि म्युजिक कंपोजर देखील आहे. लहानपणापासून तिला संगीतामध्ये विशेष रुची आहे. केवळ 6 वर्षांची असताना तिने पिताजी कमल हासन यांच्या एका सिनेमासाठी गाणेही गायले होते. कमल हासन यांच्या “चाची 420’साठी तिने पप्पांबरोबर एक गाणे गायले आहे. हे फार कमी जणांना माहिती असेल.

श्रुती हासनला लेखनाचीही आवड आहे. 14 वर्षांची असतानाच तिने सिनेमांची स्क्रीप्ट लिहायला सुरुवात केली होती. तिला एकूण 8 भाषा बोलता, लिहिता आणि वाचता येतात.

2009 मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याशिवाय “रमया वस्तावैया’, “दिल तो बच्चा है जी’, “डी डे’ आणि “गब्बर इज बॅक’ सारख्या सिनेमांमध्ये कामही केले आहे. “गब्बर इज बॅक’ बॉक्‍स ऑफिसवर हिट झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)