शाळेच्या संस्थापकावर विनयभंगाचा गुन्हा

पिंपरी – चिखली-मोशी हद्दीतील एका नामांकित शाळेच्या संस्थापकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थापकाने त्याच्याच शाळेतील महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केले आहे. ही घटना 20 जुलै रोजी शाळेतच घडली. दशरथ भोसले (रा. येरवडा) असे या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात 39 वर्षीय पीडितेने भोसले याच्या विरोधात सोमवारी (दि. 30) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या संस्थापकाने पीडित महिलेस कामानिमित्त त्यांच्या केबिनमध्ये बोलावून त्यांच्यासोबत अश्‍लील वर्तन केले, असे तक्रारीत म्हटले आहे. या आधीही शहरात शैक्षणिक संस्थांमध्ये संस्था चालकाकडूनच विनयभंग किंवा मारहाण अशा घटना घडल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)