शाळा, महाविद्यालये ही संस्कारांची मंदिरे

राजगुरूनगर येथे अजितकुमार कोष्टी यांचे प्रतिपादन

राजगुरूनगर– शाळा, महाविद्यालये ही संस्कारांची मंदिरे असून तेथे जीवनाला दिशा मिळते. मात्र, जीवन हे सुंदर व यशस्वी होण्यासाठी जगण्याची मार्मिकता समजणे गरजेचे असते, असे प्रतिपादन हास्यसम्राट प्रा. अजितकुमार कोष्टी यांनी केले.
हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत “हसवणूक’ या विषयावर कोष्टी बोलत होते. याप्रसंगी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड. देवेंद्र बुट्टेपाटील, संचालक शांताराम घुमटकर, बाळासाहेब सांडभोर, सुशील सिंगवी, डॉ. रोहिणी राक्षे, ऍड. माणिक पाटोळे, अंकुश कोळेकर, उमेश आगरकर, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा ऍड. राजमाला बुट्टेपाटील, उपप्राचार्य प्रा. जी. जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे, प्रा. डॉ. संजय शिंदे यांच्यासह महाविद्यालयाती विद्यार्थी, शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते.
आपल्या नेहमीच्या शैलीत हास्यसम्राट अजितकुमार कोष्टी यांनी अनेकविध विनोदी किस्से सांगत एकपात्री कार्यक्रम सादर केला. श्रोत्यांना मनमुराद हसविले. त्यांच्या गण्याचे विनोद प्रत्यक्ष समोर पाहताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या विनोदास हशा व टाळ्यांच्या रूपाने भरभरून प्रतिसाद दिला. विनोदाला विषय नसतो, तर प्रत्येक विषयात विनोद असतो. विनोद समजून घेण्यासाठी प्रत्येकात छोट मुले दडलेले असावे लागत. कारण विनोद घडत नसतो तो शोधावा लागतो. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईलपासून दूर राहा, स्वत:च्या क्षमता सिद्ध करा. आपण कोणत्या क्षेत्रासाठी योग्य आहोत ते शोधा. स्वत:साठी वेळ द्या, योगाभ्यास करा, जगण्यावर प्रेम करा. जीवनातील बारकावे समजून घेऊन हसतखेळत जगा आणि जीवनास समर्थपणे सामोरे जाण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही. बी. दौंडकर, वक्‍त्यांचा परिचय प्रा. प्रवीण कारले तर कोमल गायकवाड हिने आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)