शाळा खोल्या बांधकामासाठी तत्वतः मान्यता

file photo

शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्था शिर्डीच्या दि.2 मे 2018 रोजीच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीतील निर्णय क्रं.287 अन्वये, जिल्हा परिषद, अहमदनगर यांना शाळा खोल्या बांधकामासाठी 30 कोटी रुपये अनुदान देण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी पहिला टप्पा रुपये 10 कोटी शासन मान्यतेनंतर वितरणास मान्यता दिलेली असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी दिली.
श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, व्यवस्थापन समितीचे दिनांक 02 मे 2018 रोजी झालेल्या सभेतील निर्णय क्रमांक 287 अन्वये जिल्हा परिषद, अहमदनगर यांना शाळा खोल्या बांधकामासाठी रुपये 30 कोटी अनुदान देण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी पहिला टप्पा 10 कोटी रुपये शासन मान्यतेनंतर वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार शासनाकडे शाळा खोल्या बांधकामासाठी दिनांक 11 मे 2018 रोजी पहिल्या टप्प्यांचे रुपये 10 कोटी अनुदान मंजूरीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे.
सदर प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाल्यानंतर तात्काळ निधी जिल्हा परिषद, अहमदनगर यांना वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे सांगुन जिल्हा परिषद पदाधिकारी यांनी या संदर्भात सुरु केलेले पदयात्रा आंदोलन मागे घेण्यात यावे असे आवाहन श्रीमती अग्रवाल यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)