शारिरीक स्वास्थ्यासाठी शुध्द आहार घ्यावा – प्रतिभाकुंवरजी म. सा.

पिंपरी – मानसिक, शारिरीक स्वास्थ्यासाठी सर्वांनी शुध्द आहार घ्यावा. चार्तुमासात शुध्द आहार घेण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. या दिवसात वातावरण थंड, दमट असते म्हणून रसयुक्त व जास्त पाणी असणारा आहार घेऊ नये. आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणारा आहार घ्यावा, असे मार्गदर्शन प. पू. प्रतिभाकुंवरजी यांनी केले.

निगडी प्राधिकरणातील पाटीदार भवन येथे पवित्र चार्तुमास महिन्यानिमित्त वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने प. पू. प्रतिभाकुंवरजी आणि प. पू. प्रफुल्लाकंवरजी यांचे प्रवचन आयोजित केले आहे. त्यावेळी प्रतिभाकुंवरजी बोलत होत्या. यावेळी वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा उद्योजक राजू सांकला, रमणलाल लुंकड, पारस मोदी, अशोक पगारिया, बाळासाहेब धोका, सुनील नहार, मोहनलाल संचेती, सुरेखा कटारीया आदींसह पुणे, नाशिक, जळगाव, घोडनदी परिसरातून आलेले साधक उपस्थित होते. प. पू. प्रफुल्लाकंवरजी म. सा. यांचा 78 वा उपवास (आयंबिल) होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रतिभाकुंवरजी म. सा. मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, वीस वर्षांवरील प्रत्येक व्यक्तींने आठवड्यातून एक तरी दिवस उपवास करावा. त्यामुळे शरीरातील अनावश्‍यक घटक कमी होतील. मनुष्य धन कमवण्यासाठी स्वास्थ गमावतो व पुन्हा स्वास्थ मिळवण्यासाठी पुन्हा लाखोंचे धन खर्च करतो. हे टाळण्यासाठी पवित्र चार्तुमासात सर्वांनी शुध्द आहार घ्यावा. गृहिणी तन, मन, धन अर्पण करुन धर्म कार्य समजून पवित्र विचाराने प्रेरित होऊन सात्विक आहार बनवत असते. त्यामुळे जेवण करताना हातात मोबाईल, वर्तमान पत्र व समोर टिव्ही नसावा. सकारात्मक विचार करुन भोजन करावे. असेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष ललवाणी आणि शारदा चोरडिया यांनी केले. मनोहरलाल लोढा यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)