शाकाहार-काय खावे; काय खाऊ नये?

अचानक शाकाहाराकडे वळल्यास तुमच्या शरीराला मोठी अडचण होऊ शकते. अर्ध-वेळ शाकाहारी बनण्याने सुरूवात करा-संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शाकाहार खा आणि मध्यम प्रमाणात मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करून तुमचा दिवस पूर्ण करा. तुम्ही सर्व प्राणीज उत्पादने बंद करण्यापूर्वी महिनाभर असे पालन करा.

शाकाहार ही नवी संकल्पना नाही पण या संकल्पनेचा लाखो लोक पाठपुरावा करत असल्यामुळे याला प्रचंड महत्त्व मिळाले आहे. शाकाहारी आहारामध्ये प्रामुख्याने भाज्या, धान्ये,फळे आणि बदामासारख्या आरोग्यकारक दाणे, अशा वनस्पतींवर आधारित अन्नपदार्थांचा समावेश होतो. शाकाहार करणारे लोक दुग्धजन्य उत्पादने आणि अंडी यांसारखे प्राण्यांमधून मिळणारे अन्नपदार्थ खात नाहीत.

शाकाहारी लोक आरोग्य तसेच नैतिक कारणांमुळे प्राणी उत्पादनांचा उपभोग घेणे टाळतात. पण तुम्ही विना-मांस-अंडी किंवा दुग्ध संकल्पावर जाण्याच्या आधी, तुम्हाला तुम्ही कशामध्ये प्रवेश करत आहात हे जाणून घ्यायला हवे. तुम्ही शाकाहार स्वीकरण्यापूर्वी जाणून घ्याव्यात अशा काही गोष्टी येथे दिल्या आहेत:

तुमच्या आहारामधे प्रथिनांचा समावेश करायला विसरू नका:
प्रथिने अशा मूलभूत गोष्टी पुरवते जे तुमच्या शरीराच्या उती तसेच हार्मोन्स आणि विकरांची देखरेख करते आणि त्यांना दुरूस्त करते. ते तृत्पी वाढवते आणि चयापचयामध्ये सुधारणा करते. तुमच्या आहारामध्ये पुरेशी प्रथिने नसतील तर तुम्हाला थकल्यासारखे वाटते, तुम्ही वारंवार आजारी पडता आणि तुमचे केस आणि त्वचा कोरडी झाल्याचे तुमच्या लक्षात येते. वनस्पती-आधारित अन्नपदार्थ पुरेशी प्रथिने पुरवतात, पण प्रत्येक जेवणामध्ये प्रथिनांचे स्रोत समाविष्ट करणे महत्वाचे असते. बदाम हा प्रथिन-समृद्ध आहारासाठी उत्तम विकल्प असतो. मुठभर बदामांमध्ये तृप्त करणारे गुणधर्म असतात जे पोट भरल्याची अनुभूती देतात आणि दोन जेवणांमधील भूकेला दूर ठेवतात.

तुमच्या अन्नपदार्थ विकल्पांवर मर्यादा घालू नका, उत्तम पर्याय शोधा:
दुग्धजन्य उत्पादनांच्या जागी वनस्पतींमधून मिळणाऱ्या दुधाचा समावेश केला जाऊ शकतो. स्क्रॅम्बल्ड केलेल्या अंड्याच्या ऐवजी स्क्रॅम्बल्ड केलेले टोफु वापरले जाऊ शकते, तर कच्च्या अंड्यांऐवजी विविध पाककृतींमध्ये अळशी किंवा चिआ बियांचा वापर केला जाऊ शकतो. मधाऐवजी शुद्ध मॅपल सिरपसारख्या वनस्पती आधारित गोडावा देणार्याच पदार्थांचा वापर केला जाऊ शकतो. याशिवाय, शाकाहारी लोक विविध प्रकारच्या अन्नधान्यांचा तसेच फळे आणि पालेभाज्यांच्या व्यापक मालिकेचा उपभोग करतात.

पॅकेज्ड शाकाहारी पदार्थांवर अवलंबून राहू नका:
आज, पेपेरोनी पिझ्झा आणि फेक बेकनपासून ते शाकाहारी कुकीज, कॅन्डी आणि डोनट्‌सपर्यंत अशा उच्चप्रकारे प्रक्रिया केलेल्या शाकाहारी अन्नपदार्थांचा अमर्याद पुरवठा आहे. अनेक पूर्व-पॅकेज केलेले शाकाहारी अन्नपदार्थ हे कृत्रिम घटक आणि सोडीयमने युक्त असतात आणि त्यामध्ये फार जास्त कॅलरीजही असतात. पॅकेज्ड शाकाहारी पदार्थांवर फक्त आठवड्यातून एकदा उपभोग करण्याची मर्यादा घाला. त्याऐवजी शिजवलेल्या भाज्या, शेंगा आणि भिजवलेले बदाम अशा आरोग्यकारक विकल्पांची निवड करा ज्याचे पचन तुमचे शरीर सहजतेने करू शकते आणि तुम्हाला अधिक प्रमाणात पोषण मिळू शकते.

कॅल्शियमने युक्त किंवा समृद्ध अन्नपदार्थ खा:
कॅल्शियम हे महत्वाचे खनिज आहे. दुर्लक्ष केल्यास तुमच्या हाडांचे आणि दातांचे दीर्घकाळामध्ये फार नुकसान होऊ शकते आणि त्याचा तुमच्या वजनावरही परिणाम होऊ शकतो. सोयाबिनने बनलेला टोफु, केल, ब्रॉकली, व्हाईट बिन्स आणि बदाम यांसारख्या कॅल्शियमच्या गैर-दुग्ध स्त्रोतांचा समावेश करा.

व्यायाम अनिवार्य आहे:
शाकाहाराच्या फक्त तुम्ही काय खावे आणि काय खाऊ फक्त एवढेच नियम असतात, पण तुम्ही व्यायाम करू नये असा त्याचा अर्थ होत नाही. आहार लक्षात न घेता, तुम्ही जेवढे शारीरिकरित्या सक्रिय रहाल, तेवढे लवकर तुम्ही तुमच्या आरोग्याच्या ध्येय्याकडे चाल करू शकता आणि तुम्ही मधूमेह, हृदयविषयक समस्या आणि इतर गंभीर आजाराच्या जोखमी कमी करू शकता.

मांसाहार करणा-या व्यक्तींपेक्षा शाकाहारी व्यक्तींना हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल होण्याचा किंवा मृत्यूचा धोका सुमारे 32 टक्‍क्‍यांनी कमी असतो, असे ब्रिटनमध्ये झालेल्या एका नव्या संशोधनात आढळले आहे.

भरपूर पाणी प्या:
शाकाहाराकडे वळणे म्हणजे तुम्ही तुमचा शेंगा आणि दाण्यासारख्या तंतूमय पदार्थांचे ग्रहण वाढवणार आहात. वास्तवात, आहारामध्ये केलेल्या या बदलामुळे तुमचे दैनंदिन तंतूंचे ग्रहण दुप्पट होते आणि याचा अर्थ सहजपणे पचन होण्यासाठी तुम्हाला भरपूर पाण्याची गरज असते.

तुमचे शरीर अन्नपदार्थांमधील तंतूंचे विघटन करू शकत नाही आणि त्यांना तुमच्या पचन मार्गामधून तुमच्या रक्तप्रवाहामध्ये शोषून घेऊ शकत नाही, ज्यामुळे बाहेर पडण्यासाठी तंतूंना तुमच्या शरीर यंत्रणेमधून पुढे जावे लागते. पाणी याला पुढे जाण्यास मदत करते, त्यामुळे दिवसाला किमान 2 लीटर पाणी पिण्याचे ध्येय ठेवा. जर तुम्हाला फक्त पाणी आवडत नसेल, तर लिंबूचे काप टाका, स्ट्रॉबेरीज सारखी मऊ केलेली फळे, ताजा पुदिना मिसळून ते पाणी प्या.

माधुरी रुईया


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)