शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस मिञ संघ प्रयत्नशील

उरुळी कांचन- सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, पर्यावरण, आरोग्य, सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम यापुढील काळात पोलीस मिञ संघाच्या वतीने राज्यात राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलीस मिञ संघाचे संस्थापक प्रा. सुरेश वाळेकर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य पोलीस मिञ संघटनेच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महादेव नारायण दुरुंगुळे यांची पोलीस मिञ संघाच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी त्यांना निवडीचे पञ देण्यात आले. कार्यक्रमात डॉ. गोपीनाथ बोञे, जयसिंग काकडे, सुभाष झेंडे, विशाल चौधरी, अशोक जगताप, रोहिणी काळे, अर्चना सरोदे, सिमा पाटील, विजय तुपे, पिन्या खराडे, हेमलता बडेकर आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना महादेव दुरगुळे म्हणाले कि, संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळ्यात पोलीस मिञ संघटने खुपच महत्वाचे काम केले आहे. त्यांचा कोणत्याही प्रकारचा मोबदला घेतला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)