शहीद सैनिकांना श्रध्दांजली वाहून सर्वसाधारण सभा तहकूब

पिंपरी- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्‌यात 44 जवान शहीद झाले आहेत. बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहीद झालेल्या जवानांना सर्वपक्षीय नगरसेवकांच्यावतीने श्रध्दांजली वाहून सभा दि.22 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेची बुधवारी सर्वसाधारण सभा होती. सभेच्या सुरूवातीलाच भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्याची सूचना मांडली. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सर्व पक्षाच्या वतीने या भ्याड हल्ल्‌याचा निषेध करून सभा तहकूब करण्याच्या सूचनेस अनुमोदन दिले. त्यानंतर शहीद जवानांना श्रध्दांजली वाहून महापौर राहुल जाधव यांनी शुक्रवार दि.22 फेब्रुवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत सभा तहकूब केली.

स्थायी समिती सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असल्याने नव्या स्थायी समिती सदस्यांची निवड होणार आहे. स्थायी समितीत आता कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सभा पुढे ढकल्याने आता निवडीबाबतची उत्सुकता देखील लांबली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.