शहीद रवींद्र धनावडेंचे शौर्य स्मारक प्रेरणादायी

मोहाट : शहीद रवींद्र यांना पुष्पचक्र वाहताना आ शिवेंद्रराजे, वसंतराव मानकुमरे, बी के टोप्पो, संजीवकुमार व मान्यवर. (छाया : शशिकांत गुरव)

आ. शिवेंद्रराजे भोसले, शहीद रवींद्र यांना शौर्य चक्र जाहीर
मेढा, दि. 26 (प्रतिनिधी) – जावली तालुक्‍याला शौर्याची परंपरा असून देशासाठी जावळीतल्या अनेक जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. शहीद रवींद्र धनावडे यांनीही दोन अतिरेक्‍यांचा खात्मा करून पोलिसांच्या कुटुंबियांची सुटका केली. त्यांनी अतुलनीय पराक्रम केला असून त्याचा प्रत्येक जावलीकराला अभिमान आहे, आज त्यांचे हे शौर्य स्मारक तालुक्‍यातल्या प्रत्येकाचे शक्तिस्थळ बनाव, युवकांनी त्याची प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. मोहाट येथे शहीद रवींद्र बबन धनावडे यांच्या शौर्य स्मारक लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सभापती अरुणा शिर्के, जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक बी. के. टोप्पो, कमांडन्ट संजीवकुमार, उपकमांडन्ट सचिन गायकवाड, सहा. कमांडन्ट संतोष भोसले, उपनिरीक्षक रवींद्र झगडे, सपोनि जीवन माने, पं. स. सदस्य विजय सुतार, जयश्री गिरी, विलासबाबा जवळ व शहीद रवींद्रची आई, पत्नी, मुले, भाऊ आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. शिवेंद्रराजेंकडून दोन लाखांची मदत
शहीद रवींद्र धनावडे यांच्या परिवाराला आ. शिवेंद्रराजे यांच्याकडून दोन लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. त्यातील एक लाख विरमातेला तर एक लाख विरपत्नीला देण्यात आले. याच बरोबर मोहाट गावाच्या प्रवेशदवारावर गावात प्रवेश करतानाच शहीद रवींद्र यांच्या शौर्याची आठवण व्हावी म्हणून कर्तव्य सोशल ग्रुपच्यावतीने दोन लाख खर्चून स्वागत कमान बांधण्यात येणार आहे. त्याचेही भूमिपूजन आ. शिवेंद्रराजेंनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)