शहीद जवानांच्या वीरपत्नींस एसटी महामंडळाचा सलाम!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना : महाराष्ट्रदिनी वीरपत्नींना आजीवन मोफत प्रवास सवलत
पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते स्मार्टकार्डचे वाटप
नगर – शहीद जवानांच्या वीरपत्नींना आजीवन मोफत प्रवासाची सवलत राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने 1 मे अर्थात महाराष्ट्रदिनी दिली जाणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद जवान योजनेंतर्गत वीरपत्नींना ही प्रवास सवलत दिली जाणार असून, या स्मार्टकार्डचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते जिल्हा पोलीस मुख्यालयात होणाऱ्या ध्वजारोहण समारंभानंतर वितरण जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या उपस्थितीत 5 वीरपत्नींना प्रातिनिधिक स्वरूपात केले जाणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाचे वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांनी दिली.
राज्य परिवहन महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक यांनी याबाबतचा रीतसर आदेश विभाग नियंत्रक विजय गिते यांना 23 एप्रिल रोजी पाठवला आहे. शहीद जवानांच्या सर्वोच्च समर्पणाला सलाम करीत रापमंच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद जवान योजनेंतर्गत शहीद जवानांच्या वीरपत्नींना ही प्रवास सवलत दिली जात आहे. यासाठी वीरपत्नीस हस्तांतरणीय स्मार्टकार्ड दिले जाणार असून, या वीरपत्नींना रापमंच्या सर्व प्रकारच्या बसेस्‌मधून आजीवन मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील 28 वीरपत्नींना देणार स्मार्टकार्ड
महाराष्ट्रदिनी प्रातिनिधिक स्वरूपात पोलीस मुख्यालयात पार पडणाऱ्या शासकीय ध्वजारोहण समारंभात 5 वीरपत्नींना हे मोफत प्रवास स्मार्टकार्ड दिले जाणार आहे. या 5 वीरपत्नींव्यतिरिक्त जिल्ह्यातील इतर शहीद जवानांच्या वीरपत्नींना आगारप्रमुख अथवा विभागातील पालक अधिकारी यांच्यामार्फत मोफत प्रवास सवलतीचे स्मार्टकार्ड घरपोहोच देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 28 वीरपत्नींना आजीवन मोफत प्रवास सवलत स्मार्टकार्ड मिळणार असल्याचे वाहतूक अधिकारी कैलास पाटील म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)