शहिदांच्या कुटुंबियांना मराठवाडा जनविकासचा मदतीचा हात

सांगवी – काश्‍मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या वीर जवानांना पिंपळे गुरवमधील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच जखमी जवानांची प्रकृती सुधारावी, यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, शहीद झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील दोन जवानांच्या कुटूंबियांना प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याची माहिती मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी दिली. ही आर्थिक मदत या जवानांच्या घरी जाऊन देण्यात येणार असल्याचे अरुण पवार यांनी सांगितले.

यावेळी भैरुजी मंडले, सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, संपत गर्जे, गणेश ढाकणे, अनिस पठाण, बाळासाहेब धावणे, कृष्णाजी खडसे, प्रकाश बंडेवार, रमेश जाधव, डॉ.दिनेश गाडेकर यांनीही आपल्या भावना व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण केली.

अरुण पवार म्हणाले, की आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उद्देशाने महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील दोन शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्यक्ष गावी जाऊन प्रत्येकी एक्कावन्न हजाराची मदत देणार आहोत. या जवानांच्या जाण्याने देशाची मोठी हानी झाली आहे. देशाने या रूपाने मौल्यवान हिरे गमावले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here