शहा-भागवतांमध्ये मुंबईत तासभर चर्चा

मुंबई – मुंबई दौ-यावर आलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. या दोघांमध्ये शनिवारी दीड तास बैठक होऊन विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापला आहे. या पार्श्वभूमीवर दोघांतील बैठकीला महत्त्व आले आहे. दोघांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरच प्रामुख्याने चर्चा झाल्याचे समजते. अमित शहा यांनी मोहन भागवत यांची मुंबईतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यशवंत भवन या कार्यालयात भेट घेतली. चर्चेचा तपशील उघड करण्यात आलेला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढण्यासाठी विधिमंडळात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलाविली होती. ही बैठक दुपारी दोन वाजता सुरू होणार होती. या बैठकीच्या आधीच शहा-भागवत भेट झाली. यामुळे या बैठकीला महत्त्व आले असून राजकीय क्षेत्रात चर्चा रंगत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)