शहाजीनगर येथील गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थी उत्साहात

रेडा- इंदापूर तालुक्‍यातील मौजे शहाजीनगर येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने अभिषेक, भजन, आरती आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे मुख्य इंजिनिअर जी. के. गिरमे यांच्या हस्ते गणेश मूर्तीला विधिवत अभिषेक व महापूजा करण्यात आली. या वेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक धिरजकुमार माने, अकाउंट विभागाचे प्रमुख महादेव राऊत, एस. एम. दिवटे, डी. एम. लिंबोरे, ए. आर. पवार, एस. जी. जनजे पाटील समवेत कारखान्याचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)