शहर शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रम

– गुरुपौर्णिमा, उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस

पिंपरी – गुरुपौर्णिमा व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर शिवसेनेच्या शहर प्रमुख योगेश बाबर यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रम घेण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामध्ये मोहननगर मधील क्रांतीज्योती शाळा, प्रतिभा महाविद्यालय, सरस्वती विद्यालय, आकुर्डी उर्दू शाळा, काळभोरनगर महापालिका शाळेचे शिक्षक तसेच कांतीलाल खिवसरा शाळेच्या प्रा. विनया जोशी, दादा नवकुडकर, सतीश मेहेर यांचा गौरव करण्यात आला. हॅन्डीकॅप सेंटर व अंध शाळेतील मुलांना फळ वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेविका अश्‍विनी चिंचवडे, मीनल यादव, रेखा दर्शिले, माजी नगरसेविका शारदा बाबर, विजया जाधव, विमल जाधव, शहर संघटक रोमी संधू, सुशीला पवार, संतोष सौंदणकर, अनिता तुतारे, विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, अनंत कोऱ्हाळे, पिंपरी विधानसभा संघटीका प्रतिक्षा घुले, उपशहर प्रमुख तुषार नवले, युवराज कोकाटे, आबा लांडगे, संघटक सचिन औदनकर, वसंत भोसले, विनायक रणसुभे, जितेंद्र ननावरे, ज्ञानेश्‍वर शिंदे, जिल्हा संघटिका सुशीला पवार, स्वरुपा खापेकर, स्मिता जगदाळे, वैशाली कुलथे, आशा भालेकर, नंदा दातकार, भाग्यश्री म्हस्के, वैशाली काळे, ज्योत्सना गांधी, उत्तम कुटे, ओंकार नामदे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)