शहरीकरणामुळे अनौपचारिक कामगार संख्येत वाढ 

शहरातील एकूण कामगारात अनौपचारिक क्षेत्राचे प्रमाण 80% 
नवी दिल्ली – भारतातील वाढणाऱ्या शहरात सध्या क्षेत्रात लाखोच्या संख्येने अनौपचारिक कामगार काम करीत आहेत. शहरातील एकूण कामगारात त्यांचे प्रमाण तब्बल 80 टक्‍के आहे. ते एकूण बिगर कृषी उत्पादनाच्या निम्मे राष्ट्रीय उत्पन्न तयार करतात. ही माहिती एका अभ्यास अहवालात देण्यात आली आहे. डब्ल्यूआरआय सिटीजने तयार केलेल्या या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. भारतासारख्या देशात शहरीकरण वेगाने होत आहे. या शहराचा सर्वसमावेशक विकास व्हावा याकरीता नियोजनकर्त्यानी अनौपचारिक क्षेत्रातील कामगाराच्या गरजा ओळखून नियोजन करण्याची गरज असल्याचे या अहवालात सांगितले आहे. शहरातील अनौपचारिक कामगारात लाखो लोकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. खेड्यातील लोक शहराकडे येत आहेत. यामुळे शहराच्या पायाभूत सुविधावर ताण येणार आहे. नियामातून सूट मिळविण्यासाठी अनौपचारिक कामगाराचा वापर केला जातो. त्यामुळे औपचारिक क्षेत्राला अयोग्य स्पर्धेला तोंड द्यावे लागते. त्यांच्याकडून मोकळ्या जागेचा दुरूपयोग केला जातो. त्यामुळे शहरात पर्यावरणाचे प्रश्‍न काही प्रमाणात निर्माण होतात.

27 टक्‍के अनौपचारिक कामगार हे व्यापारात काम करतात. तेवढेच कामगार हे मॅन्युफॅक्‍चरींग क्षेत्रात काम करतात. 12 टक्‍के बांधकाम क्षेत्रात तर 8 टक्‍के वाहतूक क्षेत्रात काम करतात. उरलेले 24 टक्‍के कामगार इतर क्षेत्रात काम करतात. यात घरकामाचा सामावेश आहे. जर शहराची वाढ व्यवस्थित करायची असेल तर मोठया संख्येतील अनौपचारिक कामगाराना औपचारिक क्षेत्रात आणण्याची गरज आहे. त्यासाठी त्याना संघटित होण्यासाठी संधी निर्माण करण्याची गरज असल्याचे या अभ्यास अहवालाच्या लेखक मार्था चेन यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही शहरातील नियोजनकर्त्यानी या गरजा आळखून काम करण्यास सुरुवात केली आहे. भारतात स्वयंरोजगार करणाऱ्या शहरातील महिलांची संघटना आहे. या संघटनेच्या 15 लाख सदस्य आहेत. त्यांच्याकडून शहराच्या प्रशासनाबरोबर चर्चा करून या महिलासाठी पायाभूत सुविधा मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात बऱ्याच प्रमाणात यश येत आहे. या कामगाराची शहराना गरज आहे. त्यामुळे त्याचे अस्तित्व नाकारून चालणार नाही, असे चेन यानी सांगितले. कारण त्यामुळे इतर प्रश्‍न निर्माण होतील.

भुवनेश्‍वर या ठिकाणी रस्त्यावर व्यापार करणाऱ्यासाठी काही भाग राखून ठेवण्यात आला आहे. तर इतर काही शहरातही तसे प्रयोग काही प्रमाणात करण्यात येत आहेत.अनोैपचारिक क्षेत्रातील कामगारामुळे सध्या शहरे उभी राहात आहे. त्यांची शहराना गरज लागणार आहे. ती गरज ओळखून त्याना शहरातील औपचारिक क्षेत्रात सामील करून घेण्याची गरज आहे. अन्यथा शहराच्या उभारणीवर आणि देखभालीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो असे या अहवालात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)