शहरात 881 अनधिकृत फ्लेक्‍स

पिंपरी – अनधिकृत फ्लेक्‍सचा विळखा पडल्याने शहराचे विद्रुपीकरण वाढले आहे. यामुळे आकाशचिन्ह विभागातील अधिकारी स्थायीकडून चांगलेच टार्गेटवर होते. अनधिकृत फ्लेक्‍सवर कारवाई थंडावली असून गुन्हे दाखल करा, अशी सूचना मागील स्थायीत देण्यात आली होती.

आकाशचिन्ह विभागाच्या सर्व्हेत 881 फ्लेक्‍स अनधिकृत असल्याचे उघड झाले. त्यातील 200 जणांना अडीच पट दंडाच्या नोटीसा पाठवल्या. उर्वरीत फ्लेक्‍स धारकांना आठवड्यात नोटीसा मिळतील. यातून सुमारे 13 कोटी 84 लाख रुपये उत्पन्न मिळणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती ममता गायकवाड आणि विलास मडिगेरी यांनी दिली. सर्व्हेचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. सात दिवसांच्या मुदतीत दंड भरल्यास त्यांना नियमीत केले जाणार आहे. ज्यांनी दंड भरला नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुन्हे दाखल करण्याची सूचना
आकाशचिन्ह परवाना विभागाच्या सर्व्हेत अनेक फ्लेक्‍स धारकांनी महापालिकेकडून 10 बाय 10 च्या फ्लेक्‍सची परवानगी घेऊन 10 बाय 20 चे फ्लेक्‍स उभे केलेत. ती संख्या 90 टक्के आहे. त्यावर विलास मडिगेरी म्हणाले, शहरामध्ये सगळीकडेच अनधिकृत फ्लेक्‍सचा विळखा असताना फक्‍त सर्व्हेमध्ये 881 फ्लेक्‍स अनधिकृत दाखवलेत. हा आकडा चुकीचा असून यापुढे अनधिकृत फ्लेक्‍स धारकांवर गुन्हा दाखल करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)