शहरात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

निगडी : यमुनानगरमधील मॉडर्न हायस्कूलमध्ये स्काऊट गाईड पथकाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक राख्यांचे प्रदर्शन भरविले होते.

पिंपरी – बहिण-भावाचे नात्याचे महत्व अधोरेखीत करणारा रक्षाबंधन सण शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी बहिणींनी भावाला राखी बांधून, पेढा भरवत हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रविवार तसेच सार्वजनिक सुट्टी लक्षात घेत, शाळा, महाविद्यालये तसेच काही सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आदल्या दिवशीच रक्षाबंधन साजरा करण्यात आला.

रक्षाबंधनानिमित्त विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अनाथाश्रम, अंध विद्यालय, वृद्धाश्रम, पोलिस स्थानकांमध्ये जात बहिण भावाचे नातं जपण्याचा प्रयत्न केला. पर्यावरणप्रेमींनीदेखील झाडांना राखी बांधून वृक्षसंवर्धऩ व पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.शहरातील सामाजिक संस्थांतर्फे राखी विथ खाकी या ब्रिदवाक्‍याला अनुसरुन पोलिस बांधवांना राख्या बांधल्या, काही पर्यावरणवादी संघटनांनी इको फ्रेंडलीफ राखी हा उपक्रम राबवत पर्यावरण संवर्धनाचा सल्ला या निमित्ताने नागरिकांना दिला. रविवारी बाजारपेठेत राखी खरेदीसाठी सकाळपासूनच बहिणींनी मोठी गर्दी केली होती. यावेळीदूर अंतरावतर राहणाऱ्या भावांना भेटण्यासाठी बहिणींची लगबग दिसून आली. तसेच गिफ्ट खरेदीसाठी भावांचीही शहरातील दुकानांवर गर्दी होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जैन स्थानकांत रक्षा बंधन निमित्त विशेष प्रवचन
चातुमार्सानिमित्त शहरातील जैन स्थानकांमध्ये साध्वी महाराजांचे प्रवचन माला सुरु आहेत. रविवारी रक्षाबंधन असल्याने रविवारी रक्षाबंधन असल्याने विविध जैन स्थानकात विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.
थेरगाव येथील जैन स्थानकात रक्षाबंधनानिमित्त साध्वी नमिताश्रीजी यांचे विशेष प्रवचन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी धर्माची राखी बांधा, असा सल्ला दिला. राखीचा धागा हा अमूल्य आहे. तुटलेल्या नातेसंबंधांना गुंफण्याचे काम राखीच्या धाग्यातून होत असते. रक्षाबंधनानिमित्त आपण धर्माची राखी बांधायला हवी. या सणानिमित्त आपण संकल्प करायला हवा की वाईट विचारांचा त्याग करून चांगले विचार आपल्या जीवनात उतरवायला हवे. त्यामुळे धर्माची राखी आपण बांधणे आवश्‍यक आहे. तसेच साधना व आराधनेच्या मार्गावर आपण पुढे जायला हवे. व मुलांना धर्माचे संस्कार द्यायला हवे, असे मार्गदर्शन यावेळी नमिताश्री यांनी केले.
चिंचवडगाव येथील कल्याण प्रतिष्ठानमध्ये जैन चातुर्मासांतर्गत साध्वी डॉ. चंदनाजी महाराज यांचे रक्षाबंधनानिमीत्त विशेष प्रवचन झाले. त्यांनी रक्षाबंधन हे बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतिक आहे. त्यामळे भावांनी आपल्या बहिणींचा सन्मान करायला हवा, असे मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले. सध्या आधुनिकता आणि फॅशनच्या नावावर या पवित्र सणाला एका इव्हेंटचे स्वरूप आले आहे. या सणामागे असलेली आपुलकीची भावना आपण विसरत चाललो आहोत. भावांनी आपल्या बहिणीला धार्मिक कार्यात पुढे न्यायला हवे. तसेच त्यांना प्रेम व स्नेह द्यायला हवे. भावाबहीणींनी अक्षतांप्रमाणे सदैव एकत्र रहा व देव, गुरू व धर्म यावर नेहमी श्रद्धा ठेवा. असा मार्गदर्शनपर सल्ला यावेळी चंदनाजी यांनी साधकांना दिला.

सोशल मिडीयावर शुभेच्छांचा पाऊस
ज्यांना रक्षाबंधनला जाणे शक्‍य झाले नाही त्यांनी सोशल मिडीयाद्वारे एकमेकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. फेसबुक व्हाटसअप तसेच सोशल मिडीयावर विनोदी तसेच बहिण भावाच्या नात्याचे महत्व अधोरेखित करणारे व्हिडीओ फिरत होते.

मॉडर्नमध्ये पर्यावरण पूरक राखी प्रदर्शन व रक्षाबंधन
निगडी- यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूल मध्ये स्काऊट गाईड पथकाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक राख्या बनवून त्या राख्याचे प्रदर्शन भरविण्यात आले व नंतर या राख्या वृक्षांना बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्यामध्ये बिया, काड्या, कागद, नैसर्गिक रंग यांचा वापर केला. यावेळी प्राचार्य सतीश गवळी म्हणाले की, पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी असून पर्यावरणाला पूरक असा विकास करणे ही काळाची गरज असून त्या दृष्टीने कार्यवाही करण्याची आवश्‍यकता आहे. वृक्षाचे रक्षण व संवर्धन करण्याचा संदेश दिला.पर्यावरण पूरक या उपक्रमास प्रशालेचे प्राचार्य सतीश गवळी, पर्यवेक्षिका सुमती पाटसकर यांनीदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संयोजन सुजाता ठोंबरे व आशा कुंजीर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)