शहरात गुरुवारी पाणी बंद

– महापालिका व एमआयडीसीचाही पाणी पुरवठा बंद

पिंपरी – जलशुध्दीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात येणारा पाणी पुरवठा गुरुवारी (दि. 30) बंद ठेवण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या सेक्‍टर क्रमांक 23 येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाणी पुरवठा विभागाची नियमित देखभाल दुरुस्ती व काही तातडीची आवश्‍यक कामे करणे व शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे गुरुवारी केली जाणार आहेत. त्यासाठी यादिवशीचा सायंकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि. 31) सकाळचा पाणी पुरवठा अनियमित होण्याची शक्‍यता महापालिकेने वर्तवली आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) देखील बुधवारी (दि. 29) पासून गुरुवारी दुपारी बारापर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. औद्योगिक परिसरांतर्गत येणाऱ्या पिंपरी, चिंचवड, भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमई, दिघी, तळवडे तसेच देहुरोड व चाकण या भागाला पाणी पुरवठा होणार नाही. गुरुवारी दुपारनंतर कमी दाबाने व विस्कळीत स्वरुपाचा पाणी पुरवठा होण्याची शक्‍यता महामंडळाने वर्तवली आहे. आवश्‍यक पाण्याचा साठा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)