शहरातून एकाच दिवशी चार अल्पवयीन मुलींचे अपहरण

शहरातून एकाच दिवशी चार अल्पवयीन मुलींचे अपहरण
पुणे,दि.6- शहरातून एकाच दिवशी चार अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहे. याप्रकरणी बिबवेवाडी, खडकी आणी हडपसर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हे नोंदवण्यात आले आहे. बेपत्ता आणी अपहरण या अंतर्गत गुन्हयाची नोंद आहे.
अप्पर इंदिरानगर येथून सिध्दी नावाची 14 वर्षाची मुलगी बेपत्ता झाली आहे. तीला कशाचेतरी आमिष दाखवून कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तर दुसऱ्या एका घटनेत गायत्री नावाची 17 वर्षाची मुलगी बेपत्ता झाली आहे. तीलाही फुस लावून पळवून नेण्यात आल्याचे म्हटले आहे. गायत्री प्रकरणी एका तरुणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही गुन्हे बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असून याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.
औंध रस्त्यावरील घड्याळनगर येथून एक 17 वर्षाची अंकीता नावाची मुलगी राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. तीला फुस लावून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच फुरसुंगी येथील गंगानगर येथून एका 17 वर्षीय मुलीला पळवुन नेण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक तडवी करत आहेत.
अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपास करण्यात येतो. मुस्कान मोहिमेअंतर्गतही बेपत्ता असलेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात सोपवण्यात येते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.