शहरातील पोलीस ठाणे, चौक्‍यांना अवकळा

पिंपरी – शहरातील सर्व पोलीस ठाणे व चौक्‍यांना देखभाल-दुरुस्तीअभावी अवकळा आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसह याठिकाणी येणाऱ्या नागरिकांनाही विविध गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पोलीस ठाणे व चौक्‍यांच्या देखभाल-दुरुस्ती व इतर किरकोळ सुविधांची जबाबदारी महापालिकेने घ्यावी, आठ क्षेत्रीय कार्यालयांकडे ही जबाबदारी सोपवावी, अशी मागणी भाजप निगडी अध्यक्ष किशोर हातागळे यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. हातागळे यांनी यापूर्वी निगडी पोलीस ठाणे अंकित यमुनानगर पोलीस चौकीच्या दुरुस्तीची मागणी आयुक्तांकडे केली होती. त्याची प्रशासनाने दखल घेत फ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाने दुरुस्ती लवकर करण्याचे लेखी पत्र दिले आहे. याच अनुषंगाने शहरातील सर्व ठिकाणची दुरुस्ती व किरकोळ सुविधा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील व महापालिकेच्या हद्दीत असणाऱ्या पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, वाकड, सांगवी, भोसरी एमआयडीसी, चिखली व हिंजवडी या सर्व पोलीस स्टेशन व त्या अंकित असणाऱ्या सर्व पोलीस चौक्‍यांची त्या-त्या प्रभागीय क्षेत्रीय कार्यालयामार्फत देखभाल दुरुस्ती व आवश्‍यक असणाऱ्या गोष्टींची पुर्तता करण्यात यावी. तेथे असणारे पेव्हिंग ब्लॉक, रंगरंगोटी, फर्निचर, कम्पाऊंड, छताची दुरुस्ती, बसण्यासाठी बेंच, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रोपांची व झाडांची निगा व सुशोभिकरण, संगणक व प्रिंटर अशा प्रकारच्या छोट्या-छोट्या बाबींची देखभाल व दुरुस्ती करण्यात यावी.

दुरुस्तीसाठी त्यांना गृहखाते व महाराष्ट्र शासनाकडे खुप पाठपुरावा करावा लागतो त्यात बराच वेळ वायाला जातो, परंतु, ही महाराष्ट्र शासनाची मालमत्ता असल्याने त्याचा पाठपुरावा शासनाकडेच करावा लागतो, नुकतेच शहरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाले असून त्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. त्याच अनुषंगाने पोलीस ठाणे व चौक्‍यांचीही देखभाल व दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)