शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा आज सुरळीत होणार

सलग दोन दिवस नागरिकांचे पाण्यासाठी हाल
पुणे : खडकवासला मुठा उजवा कालवा फुटल्याने शुक्रवारी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लष्कर केंद्राचा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने शहराच्या पूर्व भागाच्या पाणीपुरवठ्यावर सलग दुसऱ्या दिवशी परिणाम झाला. गुरुवारी महापालिकेचे पाणी बंद असल्याने तर, शुक्रवारी जलकेंद्र बंद असल्याने या भागातील नागरिकांना टॅंकरच्या पाण्यावर दिवस काढावे लागले. दरम्यान, कालव्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून आवश्‍यक डागडुजी पूर्ण झाल्याने आज (शनिवारी) शहराच्या सर्व भागांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे.

दांडेकर पुलाजवळ गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास मुठा उजवा कालव्यास भगदाड पडले. त्यामुळे खडकवासला धरणातून कॅनॉलमधील पाणीपुरवठा तातडीने बंद केल्याने त्याच्या परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर शुक्रवारी झाला. प्रामुख्याने पुणे कॅन्टोन्मेंट परिसर, शिवाजीनगर, गणेशखिंड रोड, गोखलेनगर, पुणे स्टेशन परिसर, ताडीवाला रोड, कोरेगाव पार्क परिसर, नगररस्त्यावरील खराडी तसेच वडगाव शेरी परिसराला पाणीपुरवठा झाला नाही. जवळपास पंचवीस ते तीस टक्के भागाला पाणी मिळू शकले नाही. तर मध्यवस्तीमधील पेठा, सिंहगड रोडसह काही अन्य भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा झाला असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)