शहरांतील मैला व्यवस्थापन आवश्‍यक

सुधाकर बोबडे : वाईत हागणदार मुक्तीसाठी निवड झालेल्या पालिकांसाठी कार्यशाळा

वाई – वाई शहराला स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हागणदारी मुक्त घोषित करण्यासाठी निवडले आहे. हा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी घरगुती शौचालयांच्या संख्येत वाढ करून सार्वजनिक शौचालयावरील भार कमी करण्याची आवश्‍यकता आहे. शहरातील मैला व्यवस्थापन होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नगरविकास विभागाचे कार्यकारी संचालक सुधाकर बोबडे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाई येथे हागणदारी मुक्त करण्यासाठी निवड झालेल्या नगरपालिकांसाठी मैला व्यवस्थापन आराखडा व मैला प्रक्रिया तंत्रज्ञानाचा वापर यावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी बोबडे बोलत होते. मुख्याधिकारी सौ. विद्या पोळ, सेप्टी युनर्व्हसिटीचे असीम मन्सुरी, उपासना यादव, यांच्यासह इचलकरंजी, कऱ्हाड, लोणावळा, महाबळेश्वर, मलकापूर, पाचगणी, सासवड, सातारा, आळंदी, पन्हाळा, दाभाडे, उरण, इस्लामपूर पालिकांचे मुख्याधिकारी व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

बोबडे म्हणाले, हागणदारीमुक्त शहरांना ओडीएफ दर्जा प्राप्त करण्यासाठी तांत्रिक सहाय्य मिळण्यासाठी शासनाने आपल्या शहराची निवड केली आहे. असीम मन्सुरी, उपासना यादव यांनी मैला व्यवस्थापन कसे करावे, आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विल्हेवाट कशी लावावी, याचे सादरीकरण केले. वाईच्या मुख्याधिकारी सौ. विद्या पोळ यांनी मैला व्यवस्थापन प्रकल्प, घरोघरी जावून मैला उपसण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाइचे सादरीकरण केले. सर्व पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.

राज्यातील सर्व पालिका हगणदारीमुक्त (ओडीएफ)झाल्या असून ओडीएफ+ चे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांच्या मार्गदर्शनाखाली 13 नगरपालिकांच्या मुख्याधिकारयांची कार्यशाळेचे आयोजन वाई नगरपालिकेत करण्यात आले होते. वाई पालिकेमध्ये मैला नि:स्सारणचा पथदर्शी प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यात आला आहे.
– विद्या पोळ, मुख्याधिकारी वाई नगरपालिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)