शहरटाकळी ग्रामस्थांतर्फे होणार आ. मोनिका राजळे यांचा सत्कार

स्व. राजीव राजळे सभागृह नामकरण
भाविनिमगाव – शहरटाकळी (ता. शेवगाव) येथील आमदार मोनिका राजळे यांच्या विकास निधीतून सुमारे 10 लाख रुपये खर्चाच्या सभामंडपाचे काम पूर्ण झाले असून त्यास स्व.राजीव राजळे सभागृह नामकरण करण्याचा ग्रामस्थांचा मानस असून त्यावेळी आमदार मोनिका राजळे यांचा परिसराच्या वतीने जाहीर नागरी सत्काराचे आयोजन केले असल्याची माहिती भा. ज. पा. मा. जिल्हा सरचिटणीस वाय. डी. कोल्हे, ताराचंद लोढे यांनी दिली आहे.
शहारटाकळी येथील आमदार मोनिका राजळे यांच्या विकास निधीतून झालेल्या सभामंडपाचे भूमिपूजन स्व.राजीव राजळे याच्या हस्ते झाले होते. ते काम पूर्ण झाले असून त्यास स्व.राजीव राजळे नामकरण सोहळा होणार आहे. याप्रसंगी तालुक्‍यात बोंडआळी संदर्भात सर्वाधिक निधी उपलब्ध करूण दिल्याबद्दल परिसरातील शेतकरांच्या वतीने तसेच श्रावणबाळ, संजय गांधी योजनेच्या लाभार्थींच्या वतीने सत्कार सभारंभाचे आयोजन केलेले आहे.
स्व.राजीव राजळे व आ. मोनिका राजळे यांनी शेवगाव पाथर्डीला मोठा विकास निधी मिळवून दिला असून शहरटाकळी सह परिसरातील अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. वीज, पाणी व रस्त्याच्या ज्वलंत प्रश्नासाठी अहोरात कष्ट घेऊन विकास कामाच्या मोठा सपाटा लावला आहे. आ. राजळे यांचा विकास कामांचा झंजावात पाहून दहीगाव-ने गटातील राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते भाजपा कडे आकर्षित झाले असून अनेकांनी भाजपाचे काम केले आहे. आ.राजळे यांच्या विकास कामाच्या माध्यमातून आपण भाजपामध्ये एकसंघपणा राहण्यासाठी दहीगाव-ने गटात नेहमीच प्रयत्नशील राहणार असून शहरटाकळी गट परिसरातील रखडलेली कामे आ. राजळे यांच्या सहकार्याने पूर्ण करणार आहोत. कार्यक्रमासाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन भा. ज. पा. मा. जिल्हा सरचिटणीस वाय. डी. कोल्हे, ताराचंद लोढे ढोरसडेचे मा.सरपंच गुरुनाथ माळवदे, उदय शिंदे, मोहनराव खंडागळे, मोहन लोढे, संजय ओहळ, बाळासाहेब विखे, रमेश वाघमारे, गोकुळ निकम, भीमराज ठोंबळ, ढोरसडेचे सरपंच भाऊराव वाघमारे, आसाराम नऱ्हे, पवार महाराज, लक्ष्मण काशीद, कल्याण जगदाळे, सुरेश थोरात, रमेश पहिलवान आदींनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)