अमेरिकेचे तलिबानला आवाहन
वॉशिंग्टन (अमेरिका) – तालिबानने बंदूक आणि बॉम्ब नाही, तर मताची शक्ती वापरावी. मतपेटीतून सत्ता घ्यावी असे आवाहन अमेरिकेने केले आहे. कालच तालिबानने पुन्हा नव्याने अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले सुरू करण्याची घोषणा केली होती. सामान्यत: तालिबान हिवाळ्यात हल्ले थांबवतात आणि वसंतागमनानंतर पुन्हा सुरू करतात. त्यानुसार काल त्यांनी नव्याने हल्ले सुरू करण्याची घोषणा केला आहे. तालिबानने दहशतवाद सोडून शांतीचा मार्ग पत्करावा असे आवाहन अमेरिकेचे प्रभारी राज्यमंत्री जॉन सुलिव्हन यांनी केले आहे.
तालिबानने परदेशातील सुरक्षित आश्रय स्थाने सोडून अफगाणिस्तानात येऊन राहावे आणि शांतिवार्तेत सहभागी व्हावे, तसेच अफगाणिस्तानातील निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यावा असे आवाहन अफगाणिस्तानचे अध्यक्ष घनी यांनी केले होते. मात्र अध्यक्ष घनी यांच्या आवाहनाकडे तालिबानने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे.
तालिबानींनी आपले परदेशी नंदनवन सोडून पुन्हा अफगाणिस्तानात यावे, पाकिस्तानचा उल्लेख करून जॉन सुलिव्हन यांनी सांगितले.नव्याने दहशतवादाल सुरुवात करण्यात तालिबानचा काही लाभ नाही. त्यांनी निवडणूकीतून सत्ता मिळवावी. दहशतवादातून शांती आणि सुरक्षा येणार नाही. अफगाणिस्तानचे अध्यक्ष घनी यांनी शांतिचर्चेसाठी हात पुढे करून एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. त्याला तालिबानने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे जॉन सुलिव्हन यांनी म्हटले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा