शस्त्रास्त्रे बाळगल्यास जन्मठेप

कमाल जन्मठेपेची तरतूद असणारे विधेयक लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली : अवैध शस्त्रास्त्रे बनवणे आणि बाळगणे अतिशय महागात पडणार आहे. त्या कृत्यांबद्दल कमाल जन्मठेपेची तरतूद असणाऱ्या विधेयकाला सोमवारी लोकसभेची मंजुरी मिळाली.

देशात शस्त्रास्त्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित विधेयक आणल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत चर्चेला उत्तर देताना सांगितले. क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या नेमबाज खेळाडूंना विधेयकामुळे विशेष दर्जा मिळेल. त्यांना विविध प्रकारच्या बंदुका, रायफल यांच्यासाठी परवाने मिळतील, असे शहा यांनी स्पष्ट केले.

सध्या जास्तीत जास्त तीन शस्त्रास्त्रे बाळगण्याची अनुमती कुठल्याही परवानाधारकाला आहे. नव्या विधेयकामुळे कमाल दोन शस्त्रास्त्रे बाळगता येऊ शकतील. विधेयकात कठोर शिक्षेची आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी विविध सोहळ्यांवेळी बंदुकांच्या फैरी (सिलेब्रेटरी गनफायर) झाडल्या जातात.

तशा सोहळ्यांवेळी मानवी जीवन धोक्‍यात आणल्याच्या कृत्याबद्दल दोन वर्षांचा तुरूंगवास किंवा 1 लाख रूपयांपर्यंचा दंड किंवा दोन्हीही ठोठावले जाऊ शकते. सुरक्षा दलांची शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पळवणाऱ्यांना जन्मठेप ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.