‘शर्करा’ नियंत्रित करायचीये? मग ‘हे’ आसन करून पहाच… 

सुजाता गानू 

हे दंडस्थितीमधील ताडासनाची प्रगत स्थिती दर्शवणारी आसन आहे. प्रथम ताठ सरळ उभे राहावे. पायात कमीत कमी अंतर घ्यावे. श्‍वास घेत दोन्ही हात बाजूने वरच्या दिशेला घ्यावेत. दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफावीत. डावा दंड डाव्या कानाला व उजवा दंड उजव्या कानाला टेकून ठेवावा. श्‍वास सोडत कंबरेतून उजव्या बाजूला वाकावे. वाकल्यावर श्‍वसन संथ सुरू ठेवावे. जेवढा वेळ शक्‍य असेल तेवढा वेळ स्थिर राहावे. एकदा डाव्या बाजूने व एकदा उजव्या बाजूने असे दोन वेळा तीर्यक ताडासन करता येते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आसन सोडताना श्‍वास घेत सावकाश सरळ व्हावे. हे अतिशय सोपे आसन आहे. यामध्ये पायाच्या घोट्यापासून हाताच्या बोटापर्यंतची बाजू ताणली जाते. तिथपर्यंत भरपूर ताण येतो. त्यामुळे त्या सर्व भागांतील स्नायू ताणले जाऊन त्यांची कार्यक्षमता वाढते. पूर्ण शरीराचे रक्‍ताभिसरण सुधारते. आळस कमी होतो. ज्यांना मधुमेह झाला आहे त्यांनी शंखप्रक्षालनक्रियेत करायवयाचे हे महत्त्वाचे आसन आहे. जवळ जवळ 30 ते 50 वेळा तीर्यक ताडासन केले जाते. शंखप्रक्षालन क्रियेतील आसनांच्या सेटमधील हे एक आसन आहे.

यामुळे शर्करा नियंत्रित व्हायला मदत होते. तसेच लहान मुलांची उंची वाढविण्यासाठी हे आसन नियमित करावे. स्थुलता निवारण करण्याच्या आसनातील तीर्यक ताडासन हे बराच वेळ टिकवण्याचे आसन योगतज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करावे. याच्या टिकवण्यामुळे पोटाचा घेर कमी व्हायला मदत होते व कंबरेवरील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी हे असान उपयुक्‍त ठरते तसेच दमा, अपचन, आमवाताचा त्रास आदी व्याधींवर या आसनाचा निश्‍चित फायदा होतो फक्‍त हे आसन नियमित करायला हवे म्हणजेच त्यासाठी रोजचा सराव आवश्‍यक आहे. या आसनाने पाठीच्या कण्याची कार्यक्षमता व लवचिकताही वाढते तसेच पायदुखी, टाचदुखी, गुडघेदुखी, पायातून गोळे येणे यासारखे विकार कमी होतात. तीर्यक ताडासनाचा एरवी कालावधी आपण 30 सेकंदापर्यंत टिकवू शकतो.

कटीभागाला उत्तम व्यायाम देणारे- गजराज हास्यासन 

हे दंडस्थितीतील हास्यासन आहे. गजराज म्हणजे हत्ती. हत्ती जसा सोंड हलवून डौलदारपणे पाऊले टाकतो त्याच पद्धतीने आपण हे आसन करायचे आहे. दंडस्थिती घ्यावी. दोन्ही पायात अंतर घ्यावे. डावा पाय पुढे घेऊन पाऊल वळवावे. त्याचवेळी श्‍वास घेत डाव्या हाताला उजव्या हाताला पकडून उजव्या हाताची सोंडेसारखी स्थिती करावी. श्‍वास घेत घेत उजवा हात जास्तीत जास्त डोक्‍यापर्यंत नेताना हाऽ हाऽ हाऽ म्हणत हात उचलून हलवावा. एकदा डावा पाय पुढे घेऊन उजव्या हाताने वर ललकारी द्यावी. तर एकदा उजवा पाय पुढे घेऊन डाव्या हाताने वर उचलून हत्तीसारखी हाऽ हाऽ ललकारी द्यावी आणि हे करत पाऊले टाकत चालावे. या आसनस्थितीत चालताना तोंडाने आवाज करावा. म्हणजे श्‍वास सोडावा अशाप्रकारे दोन्ही हाताना गरूडासनाचा फायदा मिळतो व तसेच एकटक जो हात आपण उंचावून त्याच्या मध्यमेकडे म्हणजेच मधल्या बोटाकडे एकटक पहात ललकारी द्यावी.

या गजराज हास्यासनामुळे हातापायांचे स्नायू मजबूत होतात. शरीर आणि मनाचा हास्यामुळे ताण जातो. मेंदूतील सकारात्मक संप्रेरके जागृत होतात. त्यामुळे आनंदी आवस्था प्राप्त होते. पाठीला बाक दिल्यामुळे पाठीच्या काण्यालाही व्यायाम होतो. हाताची सोंड भरभर खाली केल्यामुळे हाताची बोटांनाही व्यायाम होतो. उजव्या हाताने डावा कान पकडून डावा हाता उजव्या हातावरून सोंडेसारखा पुढे काढतो. हे करताना कमरेतून वाकतो. काटकोनात कंबेरेत झुकूनही हे गजराज हास्यासन करता येते.

या आसनामुळे हातांना, मनगटांना, खांद्यांना, पायांना, तसेच कंबरेलाही व्यायाम उत्तम मिळतो. एक प्रकारच्या आनंदासाठी गजराज हास्यासन जरूर करावे. मात्र ते बरोबर होते आहे की नाही हे योगतज्ञाच्या मार्गदर्शनानेच कळेल. हात, मनगट, खांदे, पाय, कंबर यांना सर्वांगसुंदर व्यायाम देणारे हे आसन अर्वाचिन योगशास्त्राने विकसित केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)