शरीफ यांना रुग्णालयात हलवणार 

लाहोर: तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना प्रकृती अस्वास्थ्यतेमुळे रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. हृदयाशी संबंधित आजारामुळे आदियाला कारागृहाच्या रुग्णालयातच अतिदक्षता विभागामध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कुटुंबियांनी लंडनमध्ये खरेदी केलेल्या मालमत्तेच्या व्यवहारात भ्रष्टाचाराशी संबंधित आरोपांखाली दोषी आढळल्याने शरीफ यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रावळपिंडीतील आदियाला तुरुंगात 13 जुलैपासून त्यांना ठेवण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये शरीफ यांना किडनीची व्याधी असल्याचे निष्पन्न झाले होते.
तेंव्हाच डॉक्‍टरांनी शरीफ यांना रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस केली होती. पाकिस्तानमधील काळजीवाहू सरकारने केलेल्या सूचनेनुसार पंजाब सरकारने आज शरीफ यांना इस्लामाबादेतील पाकिस्तान इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला. शरीफ यांना छातीत दुखायला लागल्याने आज सकाळी डॉक्‍टरांच्या पथकाने शरीफ यांची तपासणी केली होती. त्यानंतर शरीफ यांना हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)