शरद राव यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण

पिंपरी – दिवंगत कामगार नेते शरद राव यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि . 1) सकाळी दहा वाजता तळेगाव दाभाडे येथील डॉ. राममोहन लोहिया समाजवादी विद्यापीठ येथे होणार असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य महापालिका-नगरपालिका, कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनचे कार्याध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी, मुंबई म्युनिसीपल मजदूर युनियनचे सचिव गोविंद कामतेकर, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, आबा गोरे, संजय कुटे, चारुशिला जोशी, दिगंबर चिंचवडे, अतुल आचार्य, नितीन समगीर, महाद्रंग वाघेरे, बंटी ठोकळ, उत्तम गंगावणे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

झिंजुर्डे म्हणाले,””शरद राव यांचा पंचधातूपासून अर्धपुतळा बनविण्यात आलेला आहे. राव यांनी चौदा राज्यांमधल्या अठरा लाख कामगारांचे नेतृत्व केले होते. त्यांनी कामगारांच्या वेदनांची जाणीव मनात ठेवून कामगार संघटनेचे काम पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ केले. कामगारांसाठी लढणारा शरद राव नावाचा हा युगपुरुष कामगार चळवळीच्या मुशीत तावून सुलाखून निघालेले एक रत्न होते. मुंबईसह देशातील एक अभ्यासू कामगार नेते म्हणून त्यांची लोकप्रियता होती. शरद राव यांचे चिरंतन स्मारक म्युनिसीपल मजदूर युनियन आणि म्युनिसीपल इंजिनिअर्स असोसिएशनचे नेते सुखदेव काशिद आणि नवनाथ घाडगे यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)