शरद पवारांनी खोटं बोलू नये!

प्रकाश आंबेडकरांनी दावा फेटाळला
मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेस धर्मनिरपेक्ष नसता तर अकोलामध्ये लोकसभा निवडणूकीत पाठींबा घेतला कशाला, या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याचे भारिप नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी आज समाचार घेतला. 1997-98 साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसचे अध्यक्ष सीताराम केसरी यांच्या बरोबर झालेल्या समझोत्यानुसार निवडणूक लढविली. त्यावेळी झालेल्या समझोत्यात शरद पवार हे कुठेही नसताना त्यांनी धड़धडीत खोटे बोलू नये असे प्रत्युत्तर प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

गेल्या आठवड्यात प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणूकीत कॉंग्रेससोबत आघाडी करण्याचे संकेत देतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टिका केली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत. मात्र त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही. तसेच राष्ट्रवादीने भाजप सरकारला बाहेरून पाठींबा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर जाण्यात आम्हाला अडचण आहे. संभाजी भिडे यांची पिलावळ राष्ट्रवादीमध्ये आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. आंबेडकरांच्या टिकेला शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच उत्तर दिले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस धर्मनिरपेक्ष नसता तर अकोल्यात झालेल्या निवडणुकीत दोन वेळा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला कशाला, असा रोखठोक सवाल पवार यांनी केला होता. पवारांच्या या टिकेनंतर आंबेडकर यांनी आज पुन्हा एकदा मुंबईत पत्रकार परिषद घेत पवारांचा दावा फेटाळून लावला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रकाश आंबेडकर म्हणाले, 1998 साली कॉंग्रेसबरोबर निवडणूकीसाठी समझोता झाला होता. त्यावेळी मी अकोल्यातून निवडणूक लढविली. मात्र त्या झालेल्या समझोत्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कुठे ही नव्हते. त्यानंतर स्व. मुरली देवरा यांनी निरोप दिला की पवार भेटायला येत आहेत. घरी आल्यानंतर त्यांनी या समझोत्यात घेण्याची मागणी केली. मात्र त्यात घेणे शक्‍य न झाल्याने त्यांनी अकोल्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार दिल्याचे सांगितले. त्यामुळे पवारांच्या वक्तव्यात तथ्य नसल्याचे सांगत माझ राजकारण आणि त्यांच्या वाक्‍याचा कोणताही संबध नसल्याचे सांगत व्यक्तीगत बोलू नये असा इशाराही त्यांनी यावेळी शरद पवारांना दिला.

या स्पष्टीकरणानंतर प्रकाश आंबेडकर यांनी राफेल करारावर टीका केली. कॉंग्रेसच्या काळात राफेल विमानाची किंमत 712 कोटी होती, भाजपाने ती 1600 कोटी केली. अचानक एवढी किंमत कशी वाढली, असा सवाल करीत उत्पादन फ्रान्सची कंपनी आणि रिलायन्स करणार, मात्र हे विमान रेडी टू यूज ठेवण्याची किंमत 1 लाख कोटी रुपयांवर जाईल अशी माझी माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारी कंपनी एचएएलला हे कंत्राट देण्याऐवजी रिलायन्सला का दिले? सरकारने राफेलची रेडी टू यूज किंमत किती असेल हेही स्पष्ट करायला हवे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)