शरद पवारांच्या बारामतीत महिलांची हेळसांड

स्वच्छातागृह उभारणीकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष : वारंवार केवळ आश्‍वासनांचे गाजर

दीपक पडकार/जळोची: देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी महिलांना 50 टक्के राजकीय आरक्षण देण्याची भूमिका मांडली, तर खासदार सुप्रिया सुळे यांनी इथूनच महिला बचत गटाच्या माध्यामातून महिला सक्षमीकरणाचा पाया घातला मात्र, खेदाची बाब म्हणजे पवारांच्या बारामतीत महिलांची हेळसांड होत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे.
मागील काही वर्षांत बारामती शहरात शहरिकरण व नागरिकरण झपाट्याने वाढले असून बारामती शहराची सध्याची लोकसंख्या एक लाखांवर गेली आहे. या लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या महिलांची आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, महानगरपालिकेच्या दिशेने वाटचाल करत असलेली बारामती नगरपालिका मात्र, महिलांना साध्या मुलभूत सुविधा ही पुरवू शकत नसल्याचे विदारक चित्र आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जागांची निश्‍चितीकरण करुन शहरात ठिकठिकाणी महिलासांठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणार आहोत असे वारंवार आश्‍वासन दिले जात आहे. मात्र, नगरपालिकेद्वारे यावर कोणतीही कृतिशील कारवाई होताना दिसून येत नाही. खरेदीसाठी व अन्य कामकाजासाठी शहरासह तालुक्‍यातून बाजारपेठेत येणाऱ्या महिलांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. मात्र, बाजारपेठेत महिलांसाठी एक ही स्वच्छतागृह नसल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. महिला वर्गाकडून वारंवार बाजरेपेठांमध्ये स्वच्छतागृहे उभारण्याची मागणी होत आहे. मात्र, नगरपालिका या संवेदनशील बाबीकडे सातत्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.

लोकसंख्येच्या निकषाच्या आधारे शहरांत सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या अपुरी असल्याचे नुकतेच “प्रभात’च्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणीच्या निकषानुसार प्रती 35 ते 50 व्यक्‍तींमागे एक सार्वजनिक स्वच्छतागृह असणे आवश्‍यक आहे. मुख्य रस्ता, बाजार पेठेचा परिसर अशा ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह असणे आवश्‍यक आहे. पालिकेने महिलांची हेळसांड रोखण्यासाठी त्वरीत जागा निश्‍चिती करुन आवश्‍यक त्या ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्याची आवश्‍यकता आहे. शहरातील बाजारपेठेत स्वच्छतागृहांभावी महिलांची मोठ्या प्रमाणात कुंचबणा होत आहे. नाईलाजास्तव महिलांना आडोशाचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच अर्धवट कामे व अर्धवट खरेदी करुन माघारी परतावे लागत आहे. विकासाच्या बारामती नगरपालिकेला ही बाब नक्कीच भुषणावह नाही.

बारामती नगरपालिकेच्या वाढीव हद्दीत तांदुळवाडी, रुई, जळोची, समर्थनगर या भागाचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, या भागातील महिलांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे येथील महिला सांगतात. अनेक जण सर्रास उघड्यावरच बसत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या भागात महिलांसाठी मुताऱ्या, स्वच्छतागृहे नसल्याने महिलांची कुंचबणा होत असल्याचे दिसून येत आहे. शहरात आवश्‍यक त्या ठिकाणी महिलाची लोकसंख्या विचारात घेता महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारली जावीत अशी मागणी महिला वर्गा करुन जोर धरु लागली आहे.

21 महिला नगरसेविकां नावालाच?

शरद पवार कृषिमंत्री असताना राज्यातील महिलांचे आरोग्य सुदृढ राहण्याच्या उद्देशाने आरोग्य जागर ही संकल्पना मांडली होती. त्याची सुरुवात खुद्द बारामतीतून करण्यात आली होती. मात्र, बारामती नगरपालिकेत 40 पैकी 21 महिला नगरसेविका असून ही बारामतीतील महिलांना नैसर्गिकविधींसाठी वणवण भटकावे लागते आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे बारामती मतदारसंघाच्या खासदार तसेच नगरिच्या नगरध्यक्षा, आरोग्य सभापती या पदावर महिला विराजमान असताना ही शहरातील महिलांना सार्वजनिक स्वच्छतागृहांभावी कुचंबणा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)