शमिता आंतरराष्ट्रीय चित्रपटात झळकणार

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी आपल्या आगामी “द टेनंट’ या चित्रपटाबद्दल अतिशय उत्सुक आहे. लॉस एंजिलिसमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाचा फिल्ममेकर सुश्रुत जैनने या चित्रपटाची कथा लिहिली असून चित्रपटाचे दिग्दर्शनही तो करणार आहे. “द टेनंट’ ही अशा एका महिलेची कथा आहे जिचा भूतकाळ अतिशय रहस्यमय आहे.

मध्यमवर्गीय आवासीय सोसायटीत आल्यानंतर तिच्या आयुष्यात खूप सारी उलथापालथ होते, अशा महिलेची भूमिका शमिका साकारणार आहे. एकदम इंटरनॅशनल सिनेमातून पुनरागमन करण्याचे तिचे धाडस अचाट वाटावे असे आहे. मात्र शिल्पाची बहीण म्हणून ओळख टिकवायची असेल, तर तिला हे धाडस करणे क्रमप्राप्त आहे.

शमिताने या सिनेमाबद्दल बोलताना सांगितले की, चित्रपटाची तयारी मी सुरु केली आहे आणि मला हे खूप आवडत आहे. नवीन काही शिकण्याची ही खूप चांगली संधी आहे. शूटिंगची मी आतुरतेने वाट बघत आहे.

 

या महिनाअखेरीसपासून सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. सुश्रुत जैन यांनी यापूर्वी “बियॉन्ड ऑल बाऊंड्रीज’ आणि “अंधेरी’ हे चित्रपट केले होते. तर शमितासाठी “द टेनंट’ म्हणजे पुनरागमनाची संधी आहे.

अमिताभ आणि शाहरुखचे लीड रोल असलेल्या “मुहोब्बतें’मधून शमिताने बॉलिवूड पदार्पण केले होते. त्यामध्ये “जहर’. “वजह : अ रिझन टू कील’,”बेवफा’, “फरेब’ आणि “कॅश’ सारखे सिनेमे तिने केले. मात्र यापैकी “मुहोब्बतें’ वगळता अन्य कोणत्याच सिनेमाला बॉक्‍स ऑफिसवर काही विशेष कामगिरी करता आलेली नव्हती. “मुहोब्बतें’मध्येही तिच्या वाट्याला आलेला रोल केवळ सहकलाकार म्हणूनच मर्यादित होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)