शबाना आझमी यांची प्रकृती स्थीर

मुंबई : शबाना आझमी यांचा काल अपघात झाल्यानंतर त्यांना कोकीलाबे अंबानी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असले तरी त्यांचे सर्व स्कॅन रिपोर्ट सकारात्मक आहेत. त्यामुळे त्यांना फारशी गंभीर दुखापत झाली नसावी, असे शबाना यांचे पती आणि कवी जावेद अख्तर यांनी सांगितले.

कोकिलाबेन धिरूभाई रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष शेट्टी म्हणाले, शबाना यांच्या प्रकृतीला धोका नाही. त्यांची प्रकृती स्थीर आहे. त्यांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

शबाना यांच्या मोटारीने ट्रकला मागून ठोकरल्याने शबाना जखमी झाल्या. त्यांच्यामागून स्वतंत्र मोटारीतून येणारे जावेद अख्तर हे सुरक्षित राहीले. शबाना यांना तातडीने अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिवट करून त्यांना लवकर आराम वाटावा म्हणून शुभेच्छा दिल्या होत्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांना उत्तम आरोग्य चिंतले. अनिल कपूर, तब्बू, सतिष कौषिक यांच्या सह बॉलीवूडमधील अनेक सहकाऱ्यांनी त्यांची रूग्णालयात जाऊन विचारपूस केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here