शबाना आजमींच्या मोदींना शुभेच्छा; नेटकऱ्यांकडून झाल्या ट्रोल

मुंबई – नेहमीच आपल्या निर्भीड बोलण्यामुळे सतत चर्चेत असणाऱ्या बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री ‘शबाना आजमी’ यांनी मोदींच्या विजयानंतर त्यांचे अभिनंदन केले आहे. शबाना यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. मात्र, शबाना आजमी नेहमीच मोदी सरकार विरोधात बोलत असतात. त्यामुळे त्यांच्या अश्या बोलण्यामुळे त्यांना नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. ‘रात्री सुद्धा पाकिस्तानला जाण्यासाठी खूप गाड्या आहेत, तुम्ही कधी निघणार’ असं विचारत त्यांना ट्रोल करण्यात आलं आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला असून, त्यांच्या विजयासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मोदींचं कौतुक केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.