#शबरीमला प्रवेश : कनकदुर्गा यांच्या घराचे दरवाजे बंद

शबरीमला\तिरुवनंतपुरम – केरळमधील शबरीमला मंदिराची शेकडो वर्षांची परंपरा अखेर खंडित झाली होती. मंदिरात प्रवेश करण्याला होत असलेला विरोध डावलीत दोन महिलांनी शबरीमला मंदिरात भगवान अयप्पाचे दर्शन घेतले होते. बिंदू आणि कनकदुर्गा अशी या दोन महिलांची नावे आहे. यातील कनकदुर्गा या महिलेला त्यांच्याच कुटुंबीयांकडून त्रास सुरू आहे. सासूने मारहाण केल्यानंतर रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतल्यानंतर त्यांच्यासाठी घराचा दरवाजाही बंद झाला आहे. त्यांच्या घरातील इतर सदस्य दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले असून त्यांच्या सध्याच्या घराला कुलूप लागले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,”घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत कनकदुर्गा यांनी याचिका दाखल केली आहे. तसेच   कनकदुर्गा यांचा कोळीकोड मेडिकल कॉलेजमध्ये  उपचारांनंतर त्यांना घरी सोडले असता त्यांना घराला कुलूप दिसले. कनकदुर्गा यांचा पती आणि इतर कुटुंबीय दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेले आहेत. कनकदुर्गा यांनी आता ‘वन स्टॉप सेंटर’ या निर्वासितांसाठी असलेल्या छावणीमध्ये आश्रय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)