शनिवारपर्यंत पाऊस कमी होण्याची शक्‍यता

पुणे-  राज्यात ढगाळ हवामान असले तरी, पावसाने उघडीप दिली आहे. शनिवारपर्यंत (दि.28) राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्‍यता आहे. बुधवारी (दि.25) राज्यात तुरळक ठिकाणी हलका, तर कोकणात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मध्य प्रदेशात असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी झाल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. रविवारी (ता.29) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. मात्र, तोपर्यंत राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्‍यता आहे. मंगळवारी राज्यात सर्वदूर ढगाळ हवामान होते. पावसाच्या काही सरी वगळता मुख्यत: कोरडे हवामान होते. बुधवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या मध्यम सरी पडल्या. विदर्भात तुरळक पाऊस पडला. दरम्यान पुण्यात ही गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे गेले अनेक दिवसापासून ओले असणारे रस्ते आता कोरडे दिसून लागले आहेत. त्याचबरोबर पावसामुळे पडलेले खड्डेसुद्धा प्रकर्षाने जाणवू लागले आहेत. शहरातसुद्धा ही पावसाची उघडीप आणखी काही दिवस राहणार आहे, पण हवामान मात्र ढगाळ राहणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

धरणांमधील विसर्ग थांबविण्यात आला
धरण क्षेत्रातही पावसाने विश्रांती घेतल्याने चासकमान धरण वगळता अन्य सर्वच धरणांमधील विसर्ग थांबविण्यात आला आहे. चासकमान या धरणातून सध्या 2 हजार 93 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे.  पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांपैकी पानशेत आणि खडकवासला ही दोन्ही धरणे पुर्ण क्षमतेने भरली असली तरी, या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर नसल्याने विसर्ग थांबविण्यात आला आहे. खडकवासला धरणाच्या कालव्यातून फक्त 1350 क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. याशिवाय वरसगाव धरण हे 75.32 तर, टेमघर धरण हे 70.85 टक्‍के भरले आहे. या धरणांमध्ये ही पावसाचा जोर कमी झाला आहे. या चारही धरणांमध्ये मिळून सध्या 24.88 टीएमसी पाणी साठा जमा झाला असून टक्‍केवारी 85.33 इतकी झाली आहे. याशिवाय मुळशी, पवना या धरणातून ही विसर्ग थांबविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)