शंकरी कट्टा प्रतिष्ठानचे कार्य इतरांसाठी आदर्शवत

वाई ः अजित टिके यांच्या हस्ते मदतीचा धनादेश स्वीकारताना पोपटलाल ओसवाल व प्रदीप खोपडे. शेजारी मान्यवर.

बेंदराचे औचित्य साधत गोशाळेला आर्थिक मदत
वाई, दि. 26 (प्रतिनिधी) – वेळे (ता. वाई) येथील करुणा मंदिर गोशाळेला व भोर (आंबाडे) येथील जानुबाई माता गोशाळेला शंकरी कट्टा प्रतिष्ठानच्यावतीने बेंदूर सणाचे औचित्य साधून हजारांची 21 रोख स्वरूपात मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. प्रतिष्ठानचे हे गोशाळेला मदत करण्याचे पाचवे वर्ष आहे. वाई पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या हस्ते करुणा मंदिर गोशाळेचे विश्वस्त पोपटलाल ओसवाल व जानुबाई माता गोशाळेचे विश्वस्त प्रदीप खोपडे यांना आर्थिक मदतीचा चेक प्रदान करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष अनिल सावंत, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ शेलार, नगरसेवक दीपक ओसवाल, भारत खामकर, चरण गायकवाड, प्रदीप चोरगे, बाळासाहेब बागुल, संदीप जायगुडे, राजेंद्र तांबेकर, धनंजय हागीर, अजित शिंदे, संग्राम पवार, सुनिल बनकर, संतोष काळे, आप्पा मालुसरे, दिनेश खैरे, आशुतोष पवार, तुषार जगताप, श्रीरंग दिवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शंकरी कट्टा प्रतिष्ठान गेली पाच वर्षे कडबा, गुळ, पशुखाद्य या स्वरूपात मदत करीत होती.
यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके म्हणाले, गोवंशहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी काटेकोर पद्धतीने होत असल्याने भाकड जनावरांचा ओघ हा गोशाळांकडे वाढलेला आहे. परिणामी त्यांचा सांभाळ करताना गोशाळा संस्थेला तारेवरची कसरत करावी लागते, तरी हिंदुत्ववादी संघटनांनी भाकड गायींना कत्तल खाण्याकडे जाण्यापासून अवश्‍य वाचवावे, परंतु त्यांच्या संगोपनाचीही जबाबदारी घ्यावी, असेही आवाहन यावेळी टिके यांनी केले. वाई येथील धर्मपुरीतील शंकरीकट्टा प्रतिष्ठानचे कार्य हे इतरही संघटनांनी त्याचा आदर्श घेण्यासारखे आहे. यावेळी करुणा मंदीर गोशाळेचे विश्वस्त पोपटलाल ओसवाल म्हणाले, शेतकरी हा भाकड गायीनाच गोशाळेत आणून सोडतो. ही अतिशय चुकीची बाब असून गाय ही एकवेळ दूध देत नसेल परंतु गायीच्या गोमुत्राला व शेणखताला चांगली मागणी आहे. त्यामुळे गोमाता शेतकऱ्यांना कधीच जड होवू शकत नाही. याची जाण तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी ठेवल्यास गोशाळेकडे येणाऱ्या भाकड जनावरांचे प्रमाण कमी होवून त्यांचा सांभाळ करणे गोशाळेच्या विश्वस्तांना अवघड जाणार नाही. जैन समाज व समाजातील दानशूर व्यक्तींमुळेच गोशाळेत गायींचा सांभाळ करणे सोपे जाते. म्हणूनच शंकरी कट्टा प्रतिष्ठानने केलेली आर्थिक मदत कौतुकास्पद आहे. यावेळी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)