व्होडाफोन, आयडिया विलीनीकरणास मंजुरी 

नवी दिल्ली: व्होडाफोन इंडिया आणि आयडियाच्या विलीनीकरणाला दूरसंचार विभागाकडून अंतिम मंजुरी देण्यात आली. यामुळे दूरसंचार क्षेत्रातील सर्वात मोठे विलीनीकरण आणि अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण होण्यास मदत होणार आहे. या अधिग्रहणामुळे व्होडाफोन आयडिया लिमिटेड ही कंपनी वापरकर्त्यांच्या तुलनेत देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी ठरेल. व्होडाफोन इंडिया आणि त्याची उपकंपनी व्होडाफोन मोबाइल सर्व्हिसेस लिमिटेडची संपत्ती आणि अन्य कर्ज त्यांचे परवाने आयडिया सेल्युलरकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. व्होडाफोनकडून दूरसंचार विभागाला देण्यात येणाऱया स्पेक्‍ट्रम देयकातून बॅंक गॅरन्टीमध्ये संबंधित बॅंकेकडून बदल करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)