व्हॉटस ऍपसाठी तक्रार निवारण अधिकारी हवा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

नवी दिल्ली – व्हॉटस ऍपमध्ये तक्रार निवारण अधिकारी नसल्याच्या तक्रारीवरील याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात “सेंटर फॉर अकाउंटॅबिलीटी ऍन्ड सिस्टेमिक चेंज’ (सीएएससी) या स्वयंसेवी संघटनेने याचिका दाखल केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रिझर्व बॅंकेने ठरवून दिलेल्या तरतूदींप्रमाणे तरतूदी करेपर्यंत व्हॉट्‌स ऍपकडून पेमेंट सर्व्हिस राबवली जाऊ नये, अशी मागणीही या याचिकेमध्ये करण्यात आली आहे. न्या. आर.एफ. नरिमन आणि न्या. इंदू मल्होत्रा यांच्या पीठाने केंद्र सरकार आणि व्हॉट्‌स ऍपला नोटीसा बजावल्या आहेत आणि आपापले म्हणणे चार आठवड्यांच्या आत सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

व्हॉट्‌स ऍपच्या पेमेंटसाठी बॅंकेत खाते उघडले जावे. त्याची ‘केवायसी'(ग्राहकांची ओळख) पूर्तता व्हायला हवी आणि आरबीआयच्या मापदंडानुसार अन्य तरतूदींची पूर्तता व्हायला हवी, अशी माग्णी “सीएएससी’ने केली आहे.

भारतामध्ये 200 दशलक्ष लोक व्हॉट्‌स ऍप वापरतात. जवळपास 10 लाख लोक सशुल्क सेवांचा लाभ घेतात. फेसबुकची मालकी असलेल्या या चॅट- मेसेजिंग ऍपचा वापर भारतातच सर्वाधिक होतो. तर जगभरात सुमारे 1.5 अब्ज लोक याचा लाभ घेतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)