व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येला प्रेमभंगातून तरुणाची आत्महत्या

आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअॅपवर प्रेमभंगाचे ठेवले स्टेटस

नाशिक – व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येलाच प्रेमभंगातून सातपूर काॅलनीतील युवकाने स्वत:वर गाेळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. सातपूर काॅलनीतील रोहित राजेंद्र नागरे ( २८) असे मृताचे नाव आहे.

राेहित अापली अाई व भावासह राहत हाेता. शुकवारी रात्री बारा वाजता काेणाला काहीही न सांगता ताे घराबाहेर पडला होता. शनिवारी सकाळी सातपूर औद्योगिक वसाहतीच्या पाठीमागे असलेल्या भवर मळा परिसरातील नाल्याशेजारील रस्त्याच्या कडेला रोहितचा मृतदेह आढळून आला. त्याच्या छातीत गोळी लागलेली असून त्याच्या मृतदेहाजवळ देशी बनावटीचे पिस्टल तसेच पडून हाेते.

दरम्यान, त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला प्रेमभंगाचे संदेश होते. त्यामुळे त्याने प्रेमभंगातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.