#व्हिडीओ: शिरूरमध्ये राष्ट्रवादीला धक्का ! रांजणगाव गणपती ग्रामपंचायत मंगलमूर्ती पॅनेलकडे

महत्त्वाची रांजणगाव गणपती ग्रामपंचायत हातातून निसटली
– आंबळे, कळवंतवाडी, ढोकसांगवी ग्रामपंचायत राखण्यात यश
– करडेचे सरपंचपद भाजपकडे 
– विजयी उमेदवारांच्या समर्थकांचा एकच जल्लोष 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिरूर – मुकुंद ढाेबळे/संभाजी गाेरडे: शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव गणपती, चव्हाणवाडी ग्रामपंचायत येथे राष्ट्रवादीचा पराभव झाला असला तरी आंबळे ग्रामपंचायत आणि कळवंतवाडी ग्रामपंचायत, ढोकसांगवी ग्रामपंचायत ही राष्ट्रवादीकडे राहिली आहे. करडे ग्रामपंचायतमध्ये सरपंच पद भाजप पुरस्कृत पॅनेलकडे तर, सदस्य हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जास्त निवडून आले आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्‍यातील सर्व पक्षांना “कभी खुशी कभी गम’ आशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शिरूर तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. यात रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीमध्ये मंगलमूर्ती पॅनेलचा विजय झाला असून राष्ट्रवादी युवकचे जिल्हाअध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या पॅनलला पराभवाचा धक्का बसला आहे. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला असल्याचे बोलले जात आहे.

ग्रामपंचायतीमधून जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य स्वाती पाचुंदकर यांचे पती दत्तात्रय पाचुंदकर यांना सरपंचपदी पराभव स्वीकारावा लागला आहे. तर, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर दादा पाचुंदकर यांच्या मातोश्रीचाही पराभव झाला आहे. यामुळे रांजणगाव ग्रामपंचायतीमध्ये गेली दहा वर्षे मानसिंग पाचुंदकर यांची असलेली सत्ता यंदा गेली आहे. माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब पाचुंदकर आणि भीमाजी आप्पा खेडकर, श्रीकांत पाचुंदकर यांच्या हातामध्ये रांजणगाव गणपती ग्रामपंचायत गेली आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना मानहानीकारक पराभवास सामोरे जावे लागले आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी सर्जेराव खेडकर हे विजयी झाले आहेत. हा पराभव म्हणजे आंबेगाव विधानसभेचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनाही विचार करणारा असल्याचे बोलले जात आहे.

ढोकसांगवी ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडेच राहिली असून मल्हारी मलगुंडे यांचा पॅनल याठिकाणी विजय झाला आहे. तालुक्‍याचे आणि मात्र महत्त्वाचे समजले जाणारे करडे ग्रामपंचायतीमध्ये यंदा राष्ट्रवादीचे 8 असे विजय झाले असले तरी सरपंचपदी भाजपचे सुनील इसवे हे निवडून आले असल्याने याठिकाणी राष्ट्रवादीला “कभी खुशी, कभी गम’ असे मानावे लागेल.

तरी भाजप विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल घायतडक यांना पराभवाचा धक्का बसला आहे. चव्हाणवाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि माजी सरपंच संतोष लंघे यांनी आपला गड राखला असून स्वतः सरपंचपदी निवडून आले आहेत. आंबळे ग्रामपंचायतमध्ये तालुक्‍यातील निवडणुकीकडे शिरूर आणि हवेली तालुक्‍याचे लक्ष लागले होते. कारण, या ठिकाणी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे स्वीय सहाय्यक महेश बेंद्रे निवडणूक लढवत होते. परंतु येथे त्यांचा दारुण पराभव झाला आहे. कळवंतवाडी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने गड आपला राखला असून दादासाहेब चव्हाण सर्वांचा पदी निवडून आले आहेत. तर तालुक्‍याची धानोरे ग्रामपंचायत बिन विरोध झाली आहे.

रांजणगाव गणपती ग्रामपंचायत विजयी उमेदवार 
सर्जेराव बबन खेडकर(सरपंच), आनंदा तुकाराम खेडकर, हिराबाई पंढरीनाथ खेडकर, विलास बाळासाहेब अडसुळ, अजय तुकाराम गलांडे, निलम श्रीकांत पाचुंदकर, धनंजय विठ्ठल पवार, सुजाता पंडित लांडे, सुरेखा प्रकाश लांडे, बाबासाहेब धोंडिबा लांडे, स्वाती भानुदास शेळके, सुप्रिया योगेश लांडे, राहुल अनिल पवार, रंभा मानिक फंड, अनिता सुदाम कुटे, संपत गणपत खेडकर, आकाश संजय बत्ते, अर्चना संदीप पाचुंदकर. 

करडे ग्रामपंचायत विजयी उमेदवार 
सरपंचपदी सुनील चंद्रकांत इसवे, वार्ड क्रमांक एक विजयी उमेदवार- गणेश वाघमारे,भाग्यश्री घायतडक बिनविरोध. क्रमांक 2 विजयी उमेदवार -कैलास वाळके, सुनिता, रोडे, रोहिणी वाळके. वार्ड क्रमांक 3 – सागर इसवे, किशोरी घायतडक, कार्तिका जगदाळे. क्रमांक 4 विजयी उमेदवार- अंकुश बांदल, गणेश रोडे, रूपाली जगदाळे. 

चव्हाणवाडी ग्रामपंचायतीतील विजय उमेदवार : 
सरपंचपदी संतोष लंघे विजयी, वार्ड क्रमांक एक विजयी उमेदवार – अक्षय बांदल, जयश्री लोखंडे. वार्ड क्रमांक 2 -प्रभावती गरुड, महेंद्र जासूद, शोभा मोहिते. वार्ड क्रमांक 3 -वैभव जगदाळे, स्वाती हराळे. 

आंबळे ग्रामपंचायतीतील विजयी उमेदवार : 
सरपंचपदी सोमनाथ बेंद्रे विजयी, वार्ड क्रमांक एक विजयी उमेदवार-सुनीता जाधव, जयश्री बेंद्रे, राजेंद्र झेंडे, वार्ड क्रमांक 2-शरद निंबाळकर, रंजना बेंद्रे, प्रज्ञश्र सिन्नरकर, वार्ड क्रमांक 3-प्रदीप ठोंबरे, अनिल नरवडे, पूनम बेंद्रे.

कळवंतवाडी ग्रामपंचायत विजयी उमेदवार : 
सरपंचपदी दादासाहेब चव्हाण, वार्ड क्रमांक एक- उत्तम राव चव्हाण, सारिका चव्हाण. वार्ड क्रमांक 2 – स्वाती म्हाळसकर, सुनीता अनुसे, देविदास होलगुंडे, वार्ड क्रमांक तीन-संदीप संकपाळ, स्वाती वाळके. 

ढोकसांगवी ग्रामपंचायतीतील विजय उमेदवार : 
सरपंचपदी शोभा दशरथ शेलार, वार्ड क्रमांक एक विजयी उमेदवार – सुहास मलगुंडे, संगीता अभंग, उषा अभंग सर्व बिनविरोध, क्रमांक 2- मल्हारी मलगुंडे, निलेश लगड, राणी मलगुंडे, वार्ड क्रमांक तीन -प्रवीण साळवे, मनीषा पाचंगे, जिजाबाई पाचंगे. 

धानोरे ग्रामपंचायत बिनविरोध उमेदवार : 
सरपंचपदी कालिदास झगडे, प्रभाग क्रमांक 1- संदीप भोसुरे, अर्चना कोंडे, पूनम भोसूरे, प्रभाग दोन – योगीता भोसूरे, संदीप कामठे, किसाबाई फदाले, प्रभाग तीन -गुलाब बढेकर, राजेंद्र माशीरे, एक पद रिक्त.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)