#Update: खडकवासला कालवा फुटला; लाखो लिटर पाणी दांडेकर पुलावरून सिंहगड रस्त्यावर

दांडेकर पुलावर मांगीरबाबा मंदिरापर्यंत पाणी आले
पालकांना शाळेत पोचता येत नाही
या भागातील शाळा सुटल्या, विद्यार्थ्याचे हाल
फरीद पटेल झोपडपट्टीत पाणीच पाणी

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या नवीन खडकवासला कालव्याला गुरुवारी सकाळी जनता वसहतीजवळ भगदाड पडले. त्यामुळे लाखो लिटर पाणी सकाळी सिंहगड रस्त्यावर दांडेकर पुलावरून आले. हे पाणी एवढे प्रचंड होते की त्यामुळे हा रस्ता बंद करावा लागला. शिवाय सर्व्हे नंबर १३० झोपडपट्टीमध्ये पाणी शिरले आहे. दरम्यान, या प्रकारची माहिती मिळताच पालिका तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले असून कालव्यातील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. शिवाय, घटनेची माहिती मिळताच महावितरणकडूनही या भागाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

खडकवासला धरणातून पुणे शहर आणि पुढे जिल्ह्याच्या पूर्व भागात जाणारा मुठा उजवा कालवा सिंहगड रस्त्यावर दांडेकर पुलाजवळ सकाळी सव्वा अकराच्या सुमारास फुटला.  यामुळे कालव्यातील पाणी परिसरात शिरले आणि अवघ्या काही वेळात परिसर जलमय झाला. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून कालव्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहे.

दरम्यान, घटना स्थळी आलेल्या महापौरांना नागरिकाच्या संतापाचा सामना करावा लागला, प्रशासनाने लक्ष न दिल्याने हा प्रकारा घडला असल्याचे सांगत नागरिकांनी महापौरांना घेराव घातला त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

वाचा संबंधित बातम्या…

#फोटो गॅलरी: खडकवासला कालवा फुटल्याने विस्कळीत झालेले जनजीवन

केबल खोदाईन केला घात ?

महिला पोलीस आले मदतीला धावून

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)