व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे नोंदवले जाणारे पुरावे ग्राह्य धरणार

जम्मू – व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे नोंदवले जाणारे साक्षी पुरावे ग्राह्य धरण्याची तरतूद जम्मू-काश्‍मीरमध्ये करण्यात आली असून त्या विषयीच्या अध्यादेशाला राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी मान्यता दिली आहे. या राज्यातील सर्व 12 कारागृहांमध्ये आता ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.

तसेच 12 जिल्हा न्यायालयांमध्ये ही यंत्रणा टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाणार आहे. आत्तापर्यंत प्रचलित कायद्यानुसार प्रत्यक्ष आरोपींच्या उपस्थितीतच साक्षीपुरावे नोंदवण्याची कायदेशीर तरतूद होती. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवलेले साक्षीपुरावे वैध ठरवण्यासाठी तशी कायदेशीर तरतूद कायद्यामध्ये करण्याची गरज होती. ती गरज आता या अध्यादेशाने भागणार आहे.

त्यामुळे यापुढील काळात त्या राज्यातील अशा यंत्रणेद्वारे नोंदवलेले साक्षीपुरावे आता वैध ठरणार आहेत. आरोपींची सुरक्षा, त्यांना येणाजाण्यासाठी लागणारा खर्च वाचवणे आणि वेगाने सुनावणी करणे यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)