#व्हिडीओ : कात्रज प्राणी संग्रहालयातील बछड्याचा नामकरण सोहळा उत्साहात

पुणे : कात्रज प्राणी संग्रहालयातील वाघ बागिराम आणि रिद्दी यांच्या चार बछड्याचा आज नामकरण सोहळा पार पडला. त्यात ३ नर जातीची तर १ मादी जातीचे बछडे आहेत. आकाश, सार्थक, गुरू आणि पौर्णिमा अशी या बछड्यांची नावे ठेवण्यात आली आहेत. महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत या गोंडस बछड्याचे नामकरण सोहळा झाला.

यावेळी मनसेचे गटनेते वसंत मोरे, पालिकेचे उद्यान प्रमुख अशोक घोरपडे, कात्रज प्राणी संग्रहालयाचे व्यवस्थापक डॉ. राजकुमार जाधव यांच्यासह प्राणी संग्रहालयाचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यानंतर ही पिल्ले पुणेकरांना पाहण्यास उपलब्ध झाली आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)