#व्हिडिओ : राष्ट्रद्रोही म्हटल्यावर शिक्षकांनी पाय धरताच अभविपचे विद्यार्थी पसार…

भोपाळ – भारतीय जनता पार्टीची विध्यार्थी आघाडी अखील भारतीय विध्यार्थी परिषद (अभविप) यांनी मध्यप्रदेशच्या मंदसौरमधील राजीव गांधी पीजी महाविद्यालयातील एका शिक्षकाला राष्ट्रद्रोही म्हणून संबोधले त्यानंतर जे झाले ते तुम्हाला हादरवून टाकेल.

एबीव्हीपीचे विध्यार्थी हे ‘त्या’ शिक्षकाच्या विरुद्ध वर्गाच्या बाहेर राष्ट्रद्रोही असे नारे लगावात होते आणि जर हे नारे थांबवायचे आतील तर तुम्ही माफी मागा, असे ते सांगत होते. त्यावर वैतागलेल्या शिक्षकांनी त्या सर्वाना रांगेत उभारण्यास सांगितले आणि त्याचे ते पाय कडून माफी मागू लागले. जे काय चालू आहे हे न समजल्याने ते विध्यार्थी बाजूला पळून जाऊ लागले. परांतु ते शिक्षक येथेच थांबले नाहीत तर त्यांनी त्या विद्यार्थ्यांच्या मागे जाऊन त्याचे पाय पकडले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि त्यामध्ये तो शिक्षक विद्यार्थ्यांचे पाय पकडताना दिसतो आणि त्याचबरोबर त्याच्यातील आत्मीयतेने सांगताना दिसतो की, मी महाविद्यालयात शिकवण्याचा अपराध केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)