व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सनावणीला येऊ

नित्यानंद आश्रमातील बेपत्ता मुलींची मागणी
अहमदाबाद : स्वयंघोषीत गुरू नित्यानंदच्या आश्रमातून बेपत्ता झालेल्या दोन युवतींनी वेस्ट इंडीज किंवा अमेरिकेतील भारतीय दुतावासातून व्हिडिओ कॉनफरन्स द्वारे सुनावणीत सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र न्यायलयाने त्यांना प्रत्यक्ष हजर होण्याचे आदेश दिले.

जनार्दन शर्मा यांनी त्यांच्या दोन कन्या येथील आश्रमातून बेपत्ता झाल्याचे आढळल्यानंतर हॅबियस कॉर्पस याचिका दाखल केली. त्याला या मुलींनी आपल्या वकीलांमार्फत उत्तर दिले. त्यात त्यांनी आपल्या जीवाला आपल्या जनमदात्या पित्यापासून धोका असल्याचा दावा केला. मात्र एसआर ब्रम्हभट्ट यांनी त्यांना प्रत्यक्षात हजर करण्याचे आदेश दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.