व्यावसायिकाकडून खंडणी घेणारा जेरबंद

पुणे- जीवे मारण्याची धमकी देत विमाननगर भागातील एका व्यावसायिकाकडून 10 लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात विमानतळ पोलिसांनी जितेंद्र अशोक भोसले (34, वडगाव शेरी) याला अटक केली आहे.
याप्रकऱणी 42 वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे विमाननगर परिसरात दोराबजी मॉलशेजारी मोबाइल आणि पेंट विक्रीचा व्यवसाय आहे. ते विमाननगर परिसरातील बांधकाम व्यावसायिकांना पेंटची विक्री करतात. तर जितेंद्र भोसले याचे याच परिसरात कार्यालय आहे. त्याने फेब्रुवारी 2017 मध्ये त्याच्या परवानगीशिवाय पेंटची विक्री करू नये. तसेच फिर्यादींना पेंटविक्रीचा व्यवसाय करायचा असल्यास दोन लाखांची खंडणी मागितली. नाही दिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी घाबरून त्याला फेब्रुवारी 2017 ते सप्टेबरपर्यंत दहा लाख रुपये दिले. मात्र, तरीही तो त्यांना पुन्हा दोन लाखांची मागणी करू लागल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहूल घुगे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)