व्यापार चर्चा पुन्हा सुरु करण्यास ट्रम्प आणि जिनपिंग यांची तयारी

ओसाका, (जपान) – अमेरिका आणि चीनमधील खंडित झालेली व्यापारविषयक चर्चा पुन्हा सुरू करण्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील चर्चेदरम्यान एकमत झाले आहे. “जी-20′ परिषदेदरम्यान ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात शनिवारी झालेली चर्चा या मुद्दयावर सकारात्मक ठरली आहे.

या चर्चेनंतर चिनी उत्पादनांवरचे नवीन आयात कर अमेरिकेने स्थगित केले असल्याचे समजते आहे. या दोन्ही मोठ्या आर्थिक महासत्तांच्या बड्य नेत्यांच्या या चर्चेतून काही तोडगा निघतो का याकडे अनेक जागतिक नेत्यांचे लक्ष लागून राहिले होते.

जिनपिंग यांच्याबरोबरची चर्चा खूपच फलदायी झाली, असे ट्रम्प यांनी बैठकीनंतर सांगितले. मात्र चर्चेतील कोणताही तपशील त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितला नाही. दोन्ही बाजूंकडून संयुक्‍त निवेदन प्रसिद्धीस दिले जाणे अपेक्षित होते. अमेरिकेने चिनी मालावर नव्याने आयात शुल्क न लावण्याचे मान्य केले असल्याचे चीनने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.